
नॅशनल हायवे क्र ४४ वरील पेट्रोल पंपाजवळील घटना
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे
राळेगाव:-दुचाकीची डिव्हायडरला धडक लागून या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि १३ मार्च रोजी रात्री ९ च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या नॅशनल हायवे क्र ४४ वरील पेट्रोलपंपाजवळ घडली.प्रशांत कोरडे वय 25 वर्ष ,कुंदन हरिदास विरुळकर वय ३० वर्ष दोघेही रा.पिंपरी ता.हिंगणघाट असे अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.हे दोघेही आपल्या मोटारसायकल क्र एम एच ३१ सी एफ ७८१ ने वडकी वरून मध्यधुंद अवस्थेत आपल्या पिंपरी या गावी जात होते.वडकी गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल डिव्हायडर ला धडकली.
यामध्ये कुंदन विरुळकर याला डोक्याला व हातापायाला जबर मार लागला तसेच सोबत असलेला प्रशांत कोरडे याला पण गंभीर दुखापत झाली.घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महाले यांना कळताच त्यांनी तात्काळ पोलीस कर्मचारी अविनाश चिकराम,शंकर जुमनाके सह घटनास्थळी दाखल झाले.व गंभीर जखमी युवकाला पुढील उपचारासाठी वडणेर येथे हलविण्यात आले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस हे करीत आहे.