
तालुका प्रतिनिधी-शशिम कांबळे
तळेगाव:- यवतमाळ तालुक्यातील तळेगांव (भारी) येथील क्रांतिवीर बाबुराव शेडमाके आदिवासी समाज प्रबोधिनी मध्ये क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधुन दिनांक .१२ मार्च २०२३ रोजी आदिवासी संस्कृतीचे वाहक असलेल्या व गावातील सामाजिक,धार्मिक, आर्थिक, कौटुंबिक प्रश्नांची उकल करून गावातील सामाजिक विकासासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील १०० गावांतील २५० गांव पंचायतीचे महाजन, कारभारी,भुमक, घटया, देव्हारी यांच्या व समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा. वसंत पूरके होते तर उदघाटन तहसीलदार विठ्ठलराव कुमरे यांनी केले. वक्ते म्हणून इतिहासकार शेषराव मडावी (नागपूर)होते. पाहुणे म्हणून माजी आमदार राजुभाऊ तोडसाम,प्रल्हाद सिडाम,संजिवनी कासार, रवि शेराम, अरविंदजी वाढोणकर , राजुभाऊ पोटे, महादेवराव काळे, रमेशजी महानुर,लेतुजी जुनघरे, लक्ष्मणराव भिवनकर वा. ल. मोतीकर,शे. कादर, शे.रहेमान, रेणुकाताई सोयाम. नरेंद्रजी मानकर, जानराव गिरी आदि मान्यवर उपस्थित होते.
अहेरीची जमीनदारी वसविण्याचे श्रेय शेडमाके घराण्याकडे जाते त्याच घराण्यातील बाबुराव शेडमाके यांनी आदिवासी समाजासह इतर समाजावर ब्रिटिशांकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात चंद्रपूर/गडचिरोली परिसरातील सर्व जाती – धर्मातील तरुणांना संघटित करून बाबूरावांनी इंग्रजाविरुद्ध दिलेला लढा हे त्यांच्या संघटन कौशल्याची साक्ष देते असे सांगून मडावीनी बाबुरावांचा समग्र जीवनपट सविस्तर सांगितला. आपल्या उद् घाटनपर भाषणात विठ्ठलराव कुमरे म्हणाले की, आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा अभावमुळे असल्यामुळे अंधश्रद्धा व व्यसनाधीनता फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे तेव्हा आदिवासी समाजातील सामाजिक संघटनांनी व नोकरदार वर्ग यांनी संघटित होऊन समाजाचा विकास साधला पाहिजे . आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. वसंत पुरके म्हणाले की, आदिवासीने समाजकारण केले पाहिजे त्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही.
तसेच आदिवासी समाजाचे जे आदर्श होऊन गेले त्यांच्या जयंतीच्या/स्मृति दिनाच्या निमित्ताने सामाजिक कार्यक्रम घेऊन त्यात सामाजिक राजकीय प्रश्नांवर चर्चा होऊन समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे , ते असेही म्हणाले की ,आजच्या या स्पर्धेच्या युगात शिक्षण हे फार महत्वाचे आहे.तेव्हा आपणच आपला विकास करून घेतला पाहिजे .शेवटी त्यांनी आदिवासी संस्कृतीचे जतन करून संस्कृतीचे वाहक असलेल्या गावपंचायातीच्या महाजन, कारभारी,घट्या, देव्हारी व भुमक यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तमराव गेडाम यांनी केले तर सूत्रसंचालन धनंजय पुरके यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे भगवंत मेश्राम यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याासाठी बाळकृष्ण गेडाम,प्रल्हाद सिडाम,धनंजय पुरके,भगवंत मेश्राम,वनिश भोसले, ,राजू ठाकरे, कृष्णा पुसनाके,दीपक करचाल, अरविंद मडावी, निनाद सुरपाम ,प्रशांत कुसराम आदिनी कठोरपरिश्रम घेतले.या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.