
प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता
शेवगांव:-शेवगाव शहर व तालुक्यातील शासकीय व निमशासकिय शिक्षक व सर्व राज्य सरकारचे विविध खात्यातील कर्मचारी शेवगाव पंचायत समिती पासुन मोठी पायी फेरी काढून एकच मिशन जुनी पेंशन, पेंशन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या मालकीची ,कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक घोषणा देत हजारो कर्मचारी शेवगाव तहसील कार्यालय येथे आले भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात महात्मा गांधीनी भारतीय जनतेला – करेंगे या मरेंगे। असा नारा दिला आणी इंग्रजा विरोधात कन्या कुमारी पासुन काश्मीर पर्यंत क्रांतीची ज्योत पेटवली होती त्याच पध्दतीने आज जुनी पेंशन साठी सर्व शासकीय विभागातील घटकातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येवून संघर्ष करणे कर्म प्राप्त ठरले आहे असे प्रतिपादन प्रा. किसन चव्हाण यांनी मोर्चाला मार्गदर्शन करतांना केले पंजाब, हरियाणा,चंदिगढ येथील शेतकर्यांनी एकत्रित येवून शेतकरी विरोधी कायदा रद्द करायला सरकारला भाग पाडले त्याच पध्दतीने कर्मचार्यांची एकजुट पेंशन मिळू शकते आज संपाच्या चौथ्या दिवशी या आंदोलन मध्ये प्रा किसन चव्हाण,मछिंद्र भापकर,कैलास जाधव, राजेन्द्र फरताळे , वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, कॉम्रेड संजय नांगरे, प्रशांत बरबडे,शेख सिकंदर, सुभाष गर्जे, अशोक नवलसर,बाळासाहेब पाचरणे, विलास लवांडे, सचिन पाटील, किशोर पवार, गणेश बोडखे, विठ्ठल खर्चन,शिलाताई अंभग,व ईतर शासकीय व निमशासकिय शिक्षक व कर्मचारी तसेच महिला भगीणी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या प्रसंगी प्रा किसन चव्हाण, मछिंद्र भापकर, शिलाताई अंभग यांची उत्साहवर्धक व मार्गदर्शन पर भाषणे झाली या वेळी वंचित बहुजन आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण म्हणाले की कोणत्याही शासकीय व निमशासकिय शिक्षक व कर्मचारी यांनी सत्ताधार्यांच्या धमक्यांना घाबरू नये आपण लोकशाही व संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत वेळ प्रसंगी जेल मध्ये ही जाण्याची तयारी ठेवा हे सरकार सर्वांनाच वेठीस धरत आहे घाबरण्याचे काहीही कारण नाही वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत ठाम पणे उभी राहील या कार्यक्रमाचे सुत्र संचालन कल्याण मुटकुळे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार कैलास जाधव यांनी व्यक्त केले जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे असे आंदोलन कर्त्यांनी सागींतले उद्या उपोषण, आंदोलनाचा पाचवा दिवस आहे.
*ताजा कलम*
*यां संपामुळे सर्व शासकीय कार्यलयातील सर्वसामान्य नागरिकांची कामं खोळंबली आहेत ऐन परीक्षा काळात शिक्षक लोक संपात सहभागी झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे राज्य सरकारने यां आंदोलन बाबत सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचार्याना न्याय द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे*