
भारत माता की जय – वंदे मातरमच्या घोषणा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी चिमूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सायंकाळी 6 वाजता गौरवयात्रा काढण्यात आली.चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे नेतृत्वात नेहरू विद्याल्य चिमूर येथून सायंकाळी सहा वाजता स्वातंत्रवीर सावरकर यात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील शहीद बालाजी रायपूरकर चौक, मार्केट लाईन. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नेहरू चौक मार्गे भारत माता की जय. वंदे मातरम्. स्वातंत्रवीर सावरकर यांचा विजय असो या घोषणा देण्यात आल्या. गौरव यात्राची सांगता हुतात्मा स्मारक चिमूर येथे करण्यात आली.
गौरव यात्राला आमदार किर्तीकुमार भांगडिया, भाजप नेते डा श्याम हटवादे, भाजपा तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे यांनी मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे संचालन एकनाथ थूटे यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.या वेळी आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांचे समवेत. राजू देवतळे. मनीष तूम्मपलीवार. किशोर मुंगले. घनश्याम डूकरे. सतिश जाधव, प्रफुल कोलते, अरविंद राऊत, प्रदीप कामडी. संदीप पिसे, समीर राचलवार. बंटी वणकर. माया नन्नावरे. दुर्गा सातपुते, पुष्पा हरणे, सहित अन्य पदाधीकारी सहभागी झाले होते.