# धूम धडाक्यात आंबेडकरजयंती साजरीकरा ,विवेक भाऊ शेवाळे युवा प्रबोधन कार यांनी नागरीकांना दिला संदेश.
प्रतिनिधी-नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:-जो कार्यकर्ता वर्षभर आंबेडकरी चळवळीत राबतो, रक्ताचे पाणी करतो, हाडा मासा ची झीज करतों त्याने डॉ. बाबासाहेबांची जयंती धूम धडाक्यात साजरी केली पाहिजे असा प्रखर संदेश युवा प्रबोधन कार विवेक शेवाळे यांनी प्रबोधन करते वेळीं नागरीकांना दिला.
नागपूर ग्रामीण येथील दवलामेटी, तिजारे ले आऊट येथे दर वर्षी प्रमाणे या हि वर्षी १० दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अती उत्साहात साजरा करण्यात आली. १० दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेने झाली.
तिजारे ले आऊट परीसरात राहणारे महिला, पुरुष, बालक, बालिका, युवक, युवती एकत्र येऊन चार टीम तयार झाले ९ तरखीला शेवटचा सामना खेळला गेला. त्यानंतर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फॅशन शो, रेकॉर्डिग डान्स, भाषण स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भीम गीत स्पर्धा, फिल्मी गीत स्पर्धा, कुकिंग स्पर्धा व ईतर प्रकारचे स्पर्धा या दाहा दिवसीय सांस्कृतीक कार्यक्रमात घेण्यात आले.
१५ तारखेला युवा वक्ता विवेक भाऊ शेवाळ यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम, तसेच पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाले. या प्रबोधन कार्यक्रमाला युवा प्रबोधन कार विवेक भाऊशेवाळे तसेच सुप्रीम कोर्टाचेवकील (डॉ.) अनुपम पांडे, जयभीम फाऊंडेशनचे अध्यक्ष माणिक नीकोसेजी, सामाजिक कार्यकर्ता लभाने साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. परिसरातील विहारात इंग्लिश स्पकिंग चे मोफत वर्ग सुरु करण्याचे मानस मान्यवरांनी या वेळीं येथे बोलून दाखवले. कार्यक्रमाचे संचालन नागेश बोरकर, प्रास्ताविक नरेश गवई, आभार प्रदर्शन रोहित राऊत यांनी केले.
या दहा दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांची परीसरात नागरिकांन मध्ये अधीक उत्साह दिसून येतो. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रमाई सांस्कृतिक मंडळतील कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले.
निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस साहा पुस्तकाचा स्वरूपात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भाऊ चारभे यांचा तर्फे वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पर्धकांना जय भीम फाऊंडेशन चे अध्यक्ष माणिकजी नीकोसे यांचा तर्फे वितरित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचा अयोजन कमेटितील नागसेन मेश्राम, सोनू बोरकर, रोहित राऊत, प्रतीक बनसोड , आदित्य मेश्राम, आर्यन मेश्राम, सत्यजित धांदे, श्वेता मेश्राम, मंगला कांबळे, सुवर्णा मेश्राम, मंगला मून, ममता बोरकर, प्राची कांबळे, ममता भालाधरे, आशू मून, सुवर्णा मेश्राम, शुभम राऊत, लता टेंबुर्ने, नरेश गवई, यश गवई, स्नेहल वासनिक, गौतम साखरे, निलेश अलोने, तनु वाघमारे, रितेश गायकवाड, तायडे, नीलकंठ बनसोड, उमेश वाघमारे, राजाराम गवई, नितेश पुंडकर, हरी परतेकी, नितीन मेश्राम, जंनबंधू साहेब, यांनी सहकार्य केले, ग्राम पंचायत सदस्य श्रीकांत रामटेक यांचे विषेश सहकार्य प्रबोधन कार्यक्रमाला लाभले या बदल त्यांचे आभार मानण्यात आले.