Breaking News

वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडून बहुमान 

वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस अंमलदाराचा पोलीस अधीक्षकांकडून बहुमान

पोलीस अधीक्षकांच्या अभिनव उपक्रमाने पोलिसांना आणखी मिळेल बळ

तालुका प्रतिनिधी – शशिम कांबळे

राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या
पो.स्टे. वडकी हद्दीत मागील महिन्यात करंजी सोनामाता येथे जबरी चोरी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 रोडवरील देवधरी घाटात लुटमार सारखे गुन्हे घडले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वडकी येथे गुन्हे दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपीत इसमांना तात्काळ अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपीनी वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले होते.

सदर गुन्ह्याचा तात्काळ व कौशल्यपुर्वक तपास करून गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड व अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी सातत्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे वडकी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार विजय महाले व पी. एस. आय. चलाख पोलीस अंमलदार विनोद नागरगोजे, विलास जाधव, सचिन नेवारे, विकेश ध्यावर्तीवर यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करून त्यांचेअभिनंदन करण्यात आले .तरी पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा घडू नये करिता पोलीस सतर्क आहे असे ठाणेदार विजय महाले यांनी सांगितले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वरती कोसळले जुने वृक्ष

जिवंत इलेक्ट्रीक विद्युत तारेमुळे अनेकजण बचावले चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आले तात्काळ मदतीस धावून जिल्हा …

जिव मुठीत घेऊन शालेय विद्याथर्यांना भरपाण्यातुन येण्या-जाण्याकरीता पुलावरून करावा लागतो प्रवास

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुका येथील बोडखा मोकाशी येथील शालेय विद्याथर्यांना जिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved