Breaking News

राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्था घोटाळा प्रकरणी पोलिसांनी आरोपींना केले अटक

अन्याय निवारण समितीच्या आंदोलनाला आले यश

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – दिनांक. १९/०५/२०२३ राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिमुर रजि.नं. ८०३ या वित्तीय संस्थेमधील झालेल्या अपहारामध्ये ४ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी राजेश सुधाकरराव लांडगे, उप लेखा परिक्षक सहकारी संस्था, चिमुर यांचे लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे. चिमुर जि. चंद्रपूर अप.क्र. ३१९ / २०२२ कलम ४०६, ४०८, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७ (अ), १२०(ब), २०१, ३४ भादंवि सहकलम ३ महाराष्ट्र ठेवीदारांचा (वित्तीय आस्थापना मधिल) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयात राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चिमुर रजि.नं. ८०३ या वित्तीय संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, कार्यालयीन लिपीक, अभिकर्ता यांनी संगणमत व कट रचून मौजा चिमुर तालुका अंतर्गत येणारे मजुर, भाजीपाला, मुरमुरे विक्री करणारे व इतर छोटे व्यवसायीक या गोरगरीब गुंतवणुकदारांकडून दैनिक, एफ.डी. आर.डी., बचत मध्ये रोख रक्कमेच्या ठेवी स्विकारुन संस्थेचे उपविधीचे उल्लंघन करुन स्विकारलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यानंतर सुध्दा गुंतवणुकदारांचे मुल्यवान रोखा “संगणकीय खाते” विवरणमध्ये गुंतवणुकदारांना नुकसान, क्षती करण्याचे उददेशाने खोटा, बनावटीकरण ईलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार केला. तसेच गुंतवणुकदारांचे मुळ बचत खाते, संस्थेचे ५ वर्षांचे दैनंदिन जमा, विड्रॉल, ट्रॉन्सफर पावत्या गहाळ करुन पुरावा नष्ट केलेला आहे.

पतसंस्थेने अभिवचन दिल्याप्रमाणे ठेवी परत न करता कपटाने ठेवीदारांचा फौजदारीपात्र विश्वासघात केला. नमुद वित्तीय संस्थेचे संचालक मंडळ, व्यवस्थापक, कार्यालयीन लिपीक, अभिकर्ता यांनी संस्थेचे ७,६५,५२,४०८/- रुपयाची आर्थिक फसवणुक केली असुन गुन्हयात सहभाग असलेले आरोपी १) अरुण संभाजी मेहरकुरे वय ६० वर्ष २) अतुल अरुण मेहरकुरे वय ३५ वर्ष ३) मारोती वाल्मीक पेंदोर वय ६६ वर्ष ४) अमोल अरुण मेहरकुरे वय ३३ वर्ष यांना दिनांक १९/०५/२०२३ रोजी अटक करुन मा. विशेष न्यायालय, सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे न्यायालयात पेश करुन पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास रविंद्रसिंग परदेशी पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली शेखर देशमुख पोलीस उप अधिक्षक, पोलिस उप निरिक्षक संजय नेरकर, नितीन जाधव, पोलीस अमलदार सुरेश धाडसे, रविंद्र मानकर, संदीप वासेकर, जितेंद्र चुनारकर आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर हे करीत आहे.अशी माहिती शेखर देशमुख पोलीस उप अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचेकडून प्राप्त झाली आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

२७ एप्रिल निषेध दिन – शिक्षक भारतीचे शिक्षकांना आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-२७ एप्रिल २००० रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात …

अपघात – लग्न वऱ्हाडीना घेवून जाणारा ट्रक पलटी

गोंडमोहाळी फाट्यावरील घटना ट्रक जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील नेरी जवळील शिरपूर येथून लग्न वऱ्हाडीना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved