Breaking News

बेपत्ता अल्पवयीन दलित मुलींचा तात्काळ शोध घ्यावा

जिल्हा पोलीस उपअधिक्षकांची भेट-तपासात वेग असल्याची खैरे यांची माहिती

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-शेवगाव परिसरातून एका नातेवाईक तरूणाने फूस लावून पळवून नेलेल्या तीन अल्पवयीन मुलींचा तपास लावावा यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह मुलींच्या आई वडील यांनी आज जिल्हा पोलिस अपाधिक्षक प्रशांत खैरे यांची भेट घेऊन आपली कैफियत ऐकविली. तसेच येत्या ८ दिवसांत मुली सुरक्षित न मिळल्यास शेवगाव पोलिस स्टेशन येथे आमरण उपोषन करण्याचे पत्र दिले.शेवगाव, पाथर्डी व अहमदनगर येथील शिष्टमंडळाने खैरे यांची आज भेट घेतली. यामधे कॉ. संजय नांगरे, आकाश दौंडे, संध्या मेढे, फिरोज शेख भैरवनाथ वाकळे तसेच मुलींचे आई वडील व नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी शेवगांव तालुक्यातील चेडे चांदगांव येथील सात दिवसांपासून बेपत्ता तीन अल्पवयीन दलित मुलींचा तात्काळ शोध घेण्यात यावा यासाठी ३०.४.२०२४ पासून कुटुंबीयांसह शेवगाव पोलीस स्टेशन येथे बेमुदत आमरण उपोषणाबाबत खैरे यांना माहितीचे पत्र दिले.या तीन अल्पवयीन मुलींना दुचाकीवरून पळून नेले जात असताना नातेवाईकांनी करंजीघाट येथे मामास फोन करून सांगितले. ही घटना शुक्रवार ता. १९.४.२०२४ रोजी घडली. मुलीचे आई- वडील बीड जिल्ह्यातील मु. गुळंज ता. गेवराई येथे साखरपुड्याच्या निमित्ताने गेलेले असताना ही घटना घडली. त्याच दिवशी शेवगाव पो. स्टे.ला तक्रार दाखल केली. घटनेला सात दिवस होऊनही काहीच तपास लागलेला नाही. आरोपी सापडला नाही. मुलीच्या आई व वडीलांची मानसिक स्थिती खालावून गेली असल्याने मुलींचा तपास का लागत नाही, अशा संभ्रमावस्थेत आहेत.

जिल्हा पोलिस अपाधिक्षक यांनी गुन्हा अन्वेषण शाखेचे तपासी अधिकारी यांच्या समवेत चर्चा करून लवकरच आरोपीसह बेपत्ता मुलींचा शोध घेऊ असे सांगितले.यावेळी संतोष गायकवाड, लता बोरुडे, किशोर जाधव, उज्वला जाधव, रामदास जाधव, वनिता जाधव, अलिशा शिंदे, आशा साठे, मिरा बानाईत, सुनिता सुर्यनारायण आदी उपस्थित होते.

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

बालविवाह होत असल्यास त्वरीत संपर्क करण्याचे आवाहन

पालकांसह इतरांनाही शिक्षेची तरतूद जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 संपूर्ण राज्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved