Breaking News

लोकांना कोट्यवधींचा चुना

* शेवगावचे मातृ तीर्थ अर्बन निधी लिमिटेड चे कार्यालय गेल्या आठ पंधरा दिवसापासून बंद *

* मातृ तीर्थ अर्बन निधी लिमिटेड च्या नावाखाली शेकडो लोकांची कोट्यावधी रुपयांना फसवणूक करणारे अलीबाबा चाळीस चोर नॉट रिचेबल *

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील नेवासा रोड भागात सहा महिन्यापूर्वी थाटामाटा सुरू झालेली मातृ तीर्थ निधी अर्बन लिमिटेड ही शाखा गेल्या आठ दिवसांपासून बंद असून त्याचे संचालक आणि चेले चपाटे यांचे मोबाईल बंद आहेत दीपक चव्हाण हा मूळचा विदर्भातील भमटा शेवगाव शहरात येतो आणि नवनव्या फसव्या स्कीम आणणारा आर. बी. गायकवाड रा. तळणी याला हाताखाली धरून दिलीप औताडे निवृत्त प्राथमिक शिक्षक गीताराम आजबे टेलर दोघेही राहणार शेवगाव यांना हाताखाली धरून बाजारपेठेतील व्यापारी शिक्षक वर्ग मराठा समाजातील मोठे नेते आणि कार्यकर्ते यांना { आर. डी. एम. } मनी एक्सचेंज या नावाखाली अकरा ते अठरा टक्के व्याजाचे आमिश दाखवून कोट्यावधींच्या ठेवी स्वीकारल्या पहिले एक दोन महिने व्याजाचा परतावा ही वेळेवर दिला.‌

परंतु मोठी रक्कम गोळा झाल्यावर आणि गुंतवणूकदारांचा तगादा वाढल्याचे लक्षात येताच संबंधित अलिबाबा आपल्या चाळीस चोरांना वाऱ्यावर सोडून शेवगाव मधून फरार झाला गेल्या आठ दिवसापासून कार्यालय सुद्धा बंद आहे निधी अर्बन लिमिटेड चे संचालक फोन सुद्धा उचलत नाही फोन वर फक्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत कार्यालय उघडण्याची तसदी घेत नाहीत त्यामुळे कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक असलेले शेकडो गुंतवणूकदार हवाल दिल झाले आहेत { आपले पैसे काढून घेऊ } मग यांच्याकडे बघु अशी बोटचेपी भूमिका बरेच जण दिसत आहेत संचालक एकतर फोन घेत नाहीत आणि उचलले तर दोन-चार दिवसात व्यवहार होणार आहेत तुमचे पैसे आम्ही बुडवणार नाहीत असं “चल पुढच्या वढ्यात” सुरू आहे लाखो रुपये गुंतवलेले गुंतवणूकदार मात्र हवालदिल झाले आहेत.

*ताजा कलम*

प्राथमिक शिक्षकांनी शिक्षक बँकेचे कर्ज काढून यांना दिले याला म्हणतात { आगीतुन निघाले आणि फुपाट्यात पडले } अशी अवस्था मध्ये गुंतवणूक गंतवणूक दाराची आहे काहींनी इतर बँक पतसंस्था मधील एफ.डी. मुदत ठेवी मोडून { जास्त व्याजाच्या मोहापायी } यांच्या हवाली पैसे केले आहेत काहींनी व्याज बट्ट्याचा धंदा बंद करून यांच्याकडे रकमा हवाली केल्या आहेत गुंतवणूकदारांची अवस्था भीक नको पण कुत्रा आवर { व्याज देऊ नको पण मुद्दल दे } अशी झाली आहे

*विशेष बाब*

यातील एका भामट्याने स्वतःची बायको “बायकोच्या भाऊ आणि #डा पेक्षा मऊ” सुद्धा याच्यात अडकवला आहे

{ क्रमशः}

या फसवणाऱ्या भामट्यांची लक्तरे वेशीवर टांगनार “मी शेवगावकर”

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अंमली पदार्थ प्रतिबंधबाबत जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 9 : अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच त्याची विक्री …

‘माझ मत माझा अधिकार’ 13 मे रोजी मतदान

लक्षात ठेवा मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत बाकीची काम त्याच दिवशी करायला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved