शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
ब्रह्मपुरी:-दि.१५ जुन २०२३ रोजी झालेल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील ‘कोतवाल’ पदाच्या परिक्षेत सावळा गोंधळ निर्माण होऊन गैव्यवहार केल्याचा प्रकार विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आला. यात प्रश्न पत्रिका वितरीत करण्याआगोदर पेनाने प्रश्न पत्रिकेवर परिक्षार्थीचे बैठक क्रमाक लिहण्यात आले होते. परिक्षार्थीनि रोल नंबर लिहीताना चुका केली असता दुसरी नव्याने उत्तर पत्रिका बन्याच विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. काही परिक्षार्थीनी पेपर फक्त बैठक क्रमांक लिहून संपूर्ण पेपर न सोडविता कोरा ठेवण्यात आला. हे परिक्षार्थीच्या डोळयासमोर घडून आले व त्याच विदयार्थ्यांना सर्वाधिक गुण पेपरमध्ये देण्यात आले. उत्तरपत्रिकामध्ये बारकोडचा वापर करण्यात आलेला नसल्याने परिक्षार्थ्यांमध्ये शंका निर्माण झालेली आहे.
पेपर झाल्यानंतर त्या दिवशी आदर्श उत्तरपत्रिका नोटीस बोर्डवर लावण्यात आली नाही. परंतू ३९८ परिक्षार्थ्यांची गुणांची यादी लावण्यात आली. या परिक्षेत अनियमीतता लक्षात आल्याने यामधील झालेल्या गैरव्यवहार तात्काळ निकाली काढण्यात यावा, गैरव्यवहार तात्काळ निकाली न निघाल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व परिक्षार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू व आदोलना दरम्यान काही अनुचीत प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील.याबाबतची निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक अमृत नखाते यांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरीयांच्यामार्फत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना दिले.
यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख शामराव भानारकर, उपतालुकाप्रमुख डॉक्टर रामेश्वर राकडे उपतालुकाप्रमुख तथा सरपंच केवळ राम पारधी, गुलाब बागडे विभाग प्रमुख, कोतवाल पदाचे भरतीसाठी आलेले परीक्षार्थी अविनाश डोलारे, नीहाल ढोरे, नीलकंठ दूनेदार, राजेश्वर भुरके, जितेंद्र मंडपे, संदीप कामडी, देवेंद्र मोहूर्ले, आशिष दिघोरे, आशिष निकुरे, सत्यपाल नागपुरे, नितीन सहारे आदी. परीक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.