Breaking News

विरार शहरात छत्रपती शिवरायांच्या जयघोष करत शिवसेनेचा दिपोत्सव जल्लोषात संपन्न

प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

विरार-शिवसेना मनवेलपाडा विभाग शाखेच्या वतीने दिपावली निमित्त आयोजित करण्यात आलेला दिपोत्सव कार्यक्रम मोठा धुमधडाक्यात संपन्न झाला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विरार शहरातील मनवेलपाडा तलाव येथे २० x २० फुटाचा पणतीचा दिवा स्वस्तिक मध्ये उभारून तसेच 90 फीट रोडवरील गार्डन मध्ये दिवे लावून व त्यानंतर कारगिल नगर रिक्षा स्टॅन्ड शेजारी असलेल्या महानगरपालिकेच्या सुशोभित जागेवर दिप प्रज्वलित करून अशा विविध ठिकाणी शिवसेना विरार शहरप्रमुख उदय अरुण जाधव यांच्या हस्ते पहिला दिवा लावत फटाक्यांची आताषबाजी करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

शिवसेना उपशहरप्रमुख तुकाराम भुवड, महिला उपशहर संघटक सौ.रोशनी रा.जाधव व शाखाप्रमुख प्रितम रावराणे यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी शहर कार्यालय प्रमुख सुनील चव्हाण, महिला आघाडीच्या सौ.साक्षी उ.जाधव, शाखाप्रमुख संजय चव्हाण, चंद्रकांत सावंत, महिला शाखा संघटक सौ.स्नेहा चव्हाण, सौ.सुनीता मुळे, उपशाखाप्रमुख दिनेश खळे, विकास राणे, प्रदीप मोरे, दिपक जोगळे, उपशाखा संघटक सौ.मंगल गायकवाड, सौ.रूपाली रावराणे, सौ.प्रमिला तिवारी, मनवेलपाडा कार्यालय प्रमुख अशोक माने, गटप्रमुख प्रकाश यादव, मनोज तिवारी, राकेश रांगळे, योगेश घाणेकर, विनोद मासे, राजेश वाघरे, युवासेनेचे रोहित कदम, दिलीप पाचांगणे, आकाश मुळे, दुर्वेश देसाई, आदि शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवरायांचा जयघोष करत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतमोजणी प्रक्रियेत अतिशय गांभिर्याने काम करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

नियोजन भवन येथे अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : -निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी …

F.D.R. मुदत संपून सहा महिने झाले तरी पैसे देत नाही म्हणून महिलेने दिला भर चौकात चोप

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील डॉ. आंबेडकर चौका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved