Breaking News

शंकरपूर कांपा रस्त्यावर खड्डे व धुळीचे साम्राज्य

पंधरा दिवसात रस्त्याचे काम करा अन्यथा रस्ता रोको आंदोल करणार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

शंकरपूर:-कांपा चिमूर हा राज्य महामार्ग आहे या रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला आमंत्रण देत आहे बांधकाम विभागाकडून हे खड्डे बुजविन्यात आले असले तरी त्या खड्याममधील दगडे बाहेर आले आहेत तसेच खड्ड्यातील धुळी मूळे व्यापारी त्रस्त असल्याने या रस्त्याचे काम पंधरा दिवसांत सुरू करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शहर युवक काँग्रेस कमिटीने बांधकाम विभागाला दिला आहे.

चिमूर कांपा हा राज्य महामार्गवर 15 गावे बसले आहे तर रस्त्याच्या परिसरात 30 गावे आहेत तर 33 किलोमीटर चे अंतर आहे या सर्व गावातील नागरिकांना या रस्त्याचा वापर करावा लागतो परंतु या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत शंकरपूर ते कांपा या आठ किलोमीटर च्या अंतरावर तर जीवघेणे खड्डे आहेत या रस्त्यावरून दुचाकी चालविणेही कठीण झाले आहे या रस्त्यावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरूम व गिट्टी टाकून दोनवेळा बुजविले परंतु खड्डे आहे.तसेच आहे त्यामुळे खड्डे बुजविण्याच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खड्डे बुजविण्यासाठी आलेला लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे तसेच या खड्यातील दगडे बाहेर आले आहे व खड्यातील धुळीने अपघाताची शक्यता आहे.

तसेच या धुळीने रस्त्यालगत व्यापारी ही त्रस्त आहे रस्त्याला लागुण हॉटेल व्यावसायिक चे दुकान आहे त्यामुळे जनआरोग्य चा ही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे या रस्त्याचें काम पंधरा दिवसांत करावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अभियंता चिमूर यांना दिलेल्या निवेदनात शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोकुल सावरकर उपसरपंच अशोक चौधरी ग्रामपंचायत सदस्य निखिल गायकवाड सचिन रासेकर पिंटू शेरकी आदिंनी दिले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved