Breaking News

चिमूर येथे श्री साई मूर्ती स्थापनेचा नववा वर्धापन दिवस साजरा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर शहरातील येथील साई नगर येथे श्री साईबाबा यांच्या मूर्ती स्थापनेचा नववां वर्धापन दीन नुकताच साजरा करण्यात आला. शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला, श्री साई देवस्थान संस्थान साई नगर वडाळा पैकु येथे श्री साई मूर्ती स्थापना नववा वर्धापण दिवस नुकताच साजरा करण्यात आला. सकाळी ५ वाजता साफ सफाई करून साई बाबा मूर्तीचे अभ्यंग स्नान करण्यात आले. अभ्यंग स्नान नंतर प्रमोद भोपे महाराज यांच्या उपस्थितीत होम हवन कार्यक्रम संपन्न झाला.

श्री गुरुदेव ग्राम विकास मंडळ इंदिरा नगरच्या वतीने ध्यान साधना व सामुदायिक प्रार्थना करण्यात आली. रुकुडगिर देवस्थान संस्थानच्या वतीने भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.चिमूर शहरातून साई पालखीची भव्य शोभा यात्रा काढण्यात आली यामधे श्री सत्संग भजन मंडळ. साई महिला भजन मंडळ. लक्ष्मी महिला भजन मंडळ. गुरुदेव महिला भजन मंडळ. मंजुळा माता महिला भजन मंडळ यांनी सहभाग घेतला होता. कला व महाप्रसादांने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी शेकडो भाविकांनी साईबाबांच्या दर्शनाचा लाभ घेतला

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved