Breaking News

शेवगाव शहराच्या रखडलेल्या नियोजित पाणीपुरवठा योजनेच्या विविध अडचणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी बोलविली अधिकारी आणि नियुक्त कंपनीचे संयुक्त बैठक धरले धारेवर

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगांव:- दिनांक ०५/ १२/ २०२३ वार मंगळवार रोजी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी शेवगाव शहराच्या नवीन पाणी पुरवठा तातडीने चालू करण्यासंदर्भात बैठक घेतली. सदर बैठकीसाठी शेवगाव नगर परिषदेचे प्रशासक प्रांतधिकारी प्रसाद मते साहेब, मुख्याधिकारी सचिन राऊत साहेब, नगरपरिषद चे पाणीपुरवठा विभागाचे इंजिनीर मुंगसे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण M.G.P. चे अधिकारी, पाणी पुरवठा योजनेचे तांत्रिक सल्लागार मानव कन्स्ट्रक्शन धुळे { सनेर } व योजनेचे वादग्रस्त ठेकेदार इंद्रायणी एजन्सीचे संजीव कुमार यांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले.

नगरपालिका प्रशासन तांत्रिक सल्लागार आणि ठेकेदारी एजन्सी गेल्या सहा महिन्यापासून “पत्र- पत्र” खेळत आहेत “कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या” असा कारभार सुरू असून यावर जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी कडक ताशेरे ओढले सदर बैठकीला प्रमुख तक्रारदार सामाजिक कार्यकर्ता प्रेमसुख जाजू भा.ज. पा. महाराष्ट्र प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी विविध मुद्द्यावर मुख्याधिकारी व संबंधिताना खडे बोल सुनवून धारेवर धरले. या चर्चेमध्ये प्रेमसूख जाजू, माजी उपनगराध्यक्ष वजीरभाई पठाण, माजी सरपंच सतीश लांडे पाटील, माजी जि.प. सदस्य तथा नगरसेवक अशोक शेठ अहुजा सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांनी चर्चेत भाग घेतला त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवक सेवक अजय भारस्कर, , अंकुश कुसळकर, दिगंबर काथवटे नितीन दहिवाळकर, विनोद मोहिते, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, ऍड. शाम कणगरे व पत्रकार अविनाश देशमुख आदी उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांनी सर्व बाबींची सखोल माहिती घेऊन संबंधित योजनेचे काम १५ दिवसाच्या आता तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या व वेळेत काम सुरु न झाल्यास संबंधितवार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज दिली.

*विशेष बाब*
संबंधित पाणी योजनेतील तांत्रिक अडचणी येत्या पंधरा दिवसांमध्ये दूर न झाल्यास कुठलीही पूर्वसूचना न देताशेवगावच्या क्रांती चौकामध्ये बेमुदत उपोषण करणार असल्याचे प्रेमसुख जाजु यांनी सांगितले

*ताजा कलम*
शेवगाव शहरांमध्ये रखडलेल्या पाणी योजनेच्या संदर्भात महिला आक्रमक झाल्या असून हंडा मोर्चा पाण्याच्या टाकीवर चढणे मुख्याधिकाऱ्यांना घेरावा घालणे तहसीलदारांना निवेदन देणे भर हिवाळ्यामध्ये नाथ सागर भरलेला असताना सुद्धा शेवगावकरांना पंधरा ते सोळा दिवसांनी पाणी मिळते जुन्या पाणी योजनेला मिळणारा अपूर्वीच पुरवठा व वितरण व्यवस्थेतील तांत्रिक अडचणी दूर करून तात्पुरता दिलासा देण्याचे जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी आदेश काढले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved