Breaking News

दोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत १४१ प्रतिकृती

उदघाटन,समारोप,बक्षिस वितरण समारोह संपन्न

जिल्हा प्रतिनिधी/ जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)-दोन दिवसीय तुमसर तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन शिक्षण विभाग पंचायत समिती,तुमसरच्या वतीने महर्षी विद्या मंदिर,तुडका,तुमसर येथे करण्यात आले होते. उदघाटन समारंभ कार्यक्रमात उदघाटक म्हणून रमेश पारधी सभापती,शिक्षण व आरोग्य विभाग जि.प.भंडारा हे होते.तर अध्यक्ष स्थानी राजेश सेलोकर सभापती,कृषी व पशुसंवर्धन, जि.प.भंडारा हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर रहांगडाले सभापती प.स.तुमसर,हिरालाल नागपुरे उपसभापती,प.स.तुमसर, दिलीप सार्वे जि.प.सदस्य,बंडू बनकर जि.प.सदस्य,कृष्णकांत बघेल जि.प.सदस्य.सुषमा पारधी जि.प.सदस्य, प.स.सदस्य मान्यवर मनोज झुरमुरे,सुशीला पटले,पल्लवी कटरे,मीनाक्षी सहारे,सलोनी भोंडे ,प्राचार्य राहुल डोंगरे,प्राचार्य धिरेंद्र पुरोहित,सरपंच गुरुदेव भोंडे,सामाजिक कार्यकर्ते युवराज उईके, गटशिक्षाधिकारी अर्चना माटे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक खेताडे, गटसमनवयक सुभाष मुकुरणे उपस्थित होते.

जिल्ह्यातील सात तालुक्यात विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली.परंतु तुमसर तालुक्याने विज्ञान प्रदर्शनीत १४१ मॉडेल्स ठेवून उच्चांक गाठला असे बोलल्या जाते.याचे श्रेय तुमसर पंचायत समितीच्या गटशिक्षाधिकारी सौ.अर्चना हेमंत माटे – भीवगडे यांच्या कुशल प्रशासनाला जाते. बाल वैज्ञानिकांनी तयार केलेल्या प्रतिकृतीचे कौतुक करण्याकरिता विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प.स.सदस्य लक्ष्मीकांत सेलोकर होते तर मुख्य बक्षिस वितरक म्हणून म्हणून राजेश सेलोकर सभापती,कृषी व पशूसंवर्धन, जि.प.भंडारा हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य धिरेंद्र पुरोहित,प्राचार्य राहुल डोंगरे उपस्थित होते.

प्राथमिक विभागात प्रथम क्रमांक नयन किशोर मासुलकर, जि.प.विद्यालय, मिटेवाणी ,द्वितीय क्रमांक अक्षद राजू कापसे ,महर्षी विद्या मंदिर तूडका,तृतीय क्रमांक युक्ती मुलचंद पारधी, जि.प.शाळा मोहगाव यांना प्राप्त झाला.माध्यमिक विभागात ,प्रथम क्रमांक सक्षम दिपक मिश्रा ,सावित्रीबाई मेमोरियल विद्यालय गोबरवाही,द्वितीय क्रमांक आचल रामकिशन बुराडे ,महाराष्ट्र हायस्कूल सिहोरा,तृतीय क्रमांक – निसर्ग डी पटले,जनता विद्यालय तुमसर ने प्राप्त केला.प्राथमिक शिक्षक गटात कु . एस. ए.राठोड यांना प्रथम क्रमांक पटकावला.माध्यमिक शिक्षक विभागात कु .अबोली.पी.देशमुख, पंडीत दीनदयाल उपाध्याय विद्यालय, डोंगरला यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.प्रयोगशाळा सहायक या गटात श्री. दिलीप भाऊजी ठाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.परीक्षक म्हणून प्रमोद सेलोकर ,प्रमोद साठवने,ईश्वर चव्हाण यांनी प्रतीकृतीचे निरीक्षण करून योग्य गुणदान केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक संदीप वहीले,ज्योती नागलवाडे,मनोज कुर्वे यांनी केले.प्रास्तविक गटशिक्षणाधिकारी सौ अर्चना माटे यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी अशोक खेताडे यांनी केले.उपस्थित मान्यवरांनी भविष्यात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक होण्याचे स्वप्न बघावे व विचाराला कृतीची साथ द्यावी असा हितोपदेश केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती तुमसर आणि महर्षी विद्या मंदिर तुमसर यांनी अथक परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved