Breaking News

आपल्या राजकीय पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर रित्या मुरूम उत्खनन करून रस्त्याच्या कामासाठी वापरला शेवगावच्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू उपोषणाचा चौथा दिवस

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव

शेवगाव:-दि.14 डिसेंबर 2023 याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील चेडे चांदगाव येथील शेतकर्‍यांच्या गट नंबर २८ मधून सुमारे तीन महिन्यापूर्वी खोटे दस्ताऐवज करून व बेकायदेशीर रित्या उत्खनन करून मोठ्या प्रमाणात चोरीला गेलेला मुरूम ठेकेदार व भाजपाचे पदाधिकारी अरुण मुंडे व त्यांचे बंधू उदय मुंडे यांनी परिसरातील चापडगाव ते हातगाव रस्त्याच्या कामासाठी नेला असल्याचा थेट आरोप करून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजकीय पदाचा गैरफायदा घेऊन आर्थिक लाभासाठी शासनाची फसवणूक करून आमच्या शेतीचे नुकसान केले . अनधिकृत रित्या मुरुमाचे उत्खनन करून गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला असतांना याबाबत अद्याप कोणतीही कारवाई गौण खनिज उत्खनन कायद्या अंतर्गत महसूल खात्याकडून करण्यात आली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चेडे यांच्यासह शिवाजी रंगनाथ चेडे, श्रीराम रंगनाथ चेडे, प्रभाकर रामभाऊ चेडे परमेश्वर भगवान चेडे, आत्माराम रंगनाथ चेडे यांनी येथील तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक ११ डिसेंबर पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.

उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आपल्या तक्रारीची सविस्तर चौकशी करून दोशी आढळणाऱ्या विरुद्ध प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या कारवाईचे पत्र मिळे पर्यंत बेमुदत आमरण उपोषणउपोषण आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करून मुंडे यांनी कट रचून महसूल प्रशासन व शासनाची परवानगी न घेता तसेच शेतमालकांना न विचारता, आपली वाहने शेतामध्ये घालून शेती पंपाचे नुकसान केले आहे. जोड जमाव करून मुंडे कॉन्ट्रॅक्टरचे मालकीचे वाहनाद्वारे पाच सप्टेंबरला सकाळी सातचे सुमारास मुरूम चोरीचे काम करताना आपण चालक-मालक व त्यांचे साथीदारांना विरोध केला . तेव्हा त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी देवून ही जमीन नाही गायरान आहे . असे म्हणून शिवीगाळ केली . तशी लेखी तक्रार त्याच दिवशी मी तहसीलदारांकडे केली होती .त्यानंतर १८ सप्टेंबरला पुन्हा तक्रार दिली . {प्रत्यक्ष शेकडो ब्रास मुरूम चोरलेला असताना } राजकीय दबावापोटी तत्कालीन तलाठी तलाठी मंगेश कदम यांनी अंदाजे फक्त २० ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा पंचनामा केला.

याबाबत २१ सप्टेंबरला शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असता १७ ऑक्टोबरला सार्वजनिक बांधकाम विभागाने पंचनामा केला . तेव्हा त्यांनी आठ खड्ड्याचे मोजमाप करून गट नंबर २८ मधून ४०.६९ ब्रास मुरमाचे उत्खनन झाल्याचा अहवाल दिला . तरी सुद्धा आज अखेर कोणतीही कारवाई झाली नाही . त्यामुळे एकदाचा निकाल लागेपर्यंत बेमुदत उपोषण सुरु केले आहे. असे तक्रार अर्जात म्हटले आहे.दरम्यान सोमवारी पहिल्या दिवशी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे तालुकाध्यक्ष नंदु m मुंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाणे,बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ ‘संचालक हनुमान पातकळ ,मनोज तिवारी, अशोक तानवडे आदिंनी आंदोलकांची भेट घेऊन पाठींबा दिला.निवेदनाच्या प्रती केंद्रिय गृह मत्री, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री,विभागीय महसूल आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी अहमदनगर मोलिस कमिशनर,नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षक अहमदनगर आदिंना पाठविण्यात आल्या आहेत .

*ताजा कलम*

यापूर्वीही भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे आणि त्यांचे बंधू मुंडे कन्स्ट्रक्शन चे संचालक उदय मुंडे यांच्या विरोधात पिंगेवाडी येथील शासकीय जागेतील वाळू साठा वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता भाजपचे अरुण मुंडे सध्याच्या राजकीय वलयामध्ये अरुण मुंडे यांचे नाव मोठे होत असल्याने राजकीय आकसातून कुणी दाखवलं होत आहेत का अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved