Breaking News

शेवगाव शहरातील क्रांती चौक येथे हॉकर्स युनियन च्या हातगाडी धारकांना अतिक्रमण झाले या नावाखाली विनाकारण तकलिफ देण्याच्या कारणास्तव बेमुदत आमरण उपोषण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव

शेवगाव:- गुरुवार दि.१३/१२/२०२३ } याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील क्रांती चौकामध्ये अमरण उपोषण सुरु आजचा दुसरा दिवस
शेवगाव गेल्या ३० ते ४० वर्षापासुन शेवगाव क्रांती चौक येथे फळ विक्रेते, वडापाव, भजेपाव विक्रेते, भेळ विक्रेते, अंडापाव विक्रेते, आईस्क्रिम विक्रेते, सोडा विक्रेते यांच्या हातगाडया लागत आहेत. हातगाडी धारकांना सहा महिण्यापुर्वी शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी बैठकिस बोलावुन नियमांचे पालन करण्याचे सांगितले. तदनंतर हातगाडी धारकांनी आपल्या हातगाडीवर नोपार्कींग बोर्ड लावले त्याचबरोबर आपला व्यवसाय करण्यासाठी सा.बा.उपविभाग यांच्याकडुन रस्त्यावरील पांढरे पटटे मारून घेतले. व आपला व्यवसाय सुरळीत सुरू केला. गेल्या तीन महिण्यापासुन हातगाडी बंद केलेली आहे.

याबाबत प्रशासनाला दि.०५/१२/२०२३ रोजी शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी सदरील हातगाडी धारकांना या ठिकाणी तुमचे अतिक्रमण आहे. या कारणास्तव हातगाडया काढण्याचे सांगितले. त्यांच्याषी चर्चा केली असता त्यांनी मला वरिष्ठांचा आदेष आहे. तुम्ही वरिष्ठांना बोला. अशा प्रकारची उत्तरे दिली. व हातगाडी धारकांवर हातगाडी बंद करून उपासमारीची वेळ आणलेली आहे. या मागणीसाठी दि.१३/१२/२०२३ रोजी अमरण उपोषणास बसलो आहोत तसेच न्याय न मिळाल्यास अन्नपाणी त्याग आंदोलन सुरू असल्याचे निवेदनाद्वारे कळविलेआहे. यावेळी कॉ.संजय नांगरे, राहूलसावंत, सतिष बोरूडे, संजय लहासे, तान्हाजी मोहिते, चंद्रकांत कर्डक, सुभाष पाटील लांडे, प्रा.कीसन चव्हाण,संजयजी फडके,प्यारेलाल शेख,कैलास तिजोरे,बाळासाहेब लष्करे, संदिप काथवटे, गणपत भाडाईत, सय्यद मोसिन, इरफान पठाण, पप्पुभाई तांबोली, राजु मोहिते, बबलु गुप्ता, सचिन शिनगारे, रावसाहेब गुंजाळ, आदिल आतार,मुन्ना भोकरे, किरण गायकवाड,सतिष गायकवाड, शेख जावेद असिफ, जावेद बागवान, जुबेर शेख, इरफान पठाण,अश्पाक बागवान आदींचा सहभाग आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरांमध्ये क्रांती चौक बरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक संत गाडगेबाबा चौक मिरी रोड नेवासा रोड मुख्य बाजारपेठ मोची गल्ली वरुड रोड पैठण रोड नित्यसेवा चौक आधी सर्वच भागात फेरीवाले आणि टपऱ्यांच्या अतिक्रमण आहे परंतु वैयक्तिक आकसापोटी कारवाई मात्र फक्त क्रांती चौक बस स्थानकासमोरील चौक येथेच होताना दिसत आहे याबाबतची अहवासींमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे “एका अतिक्रमण धाराला गुलाबजांबू आणि दुसऱ्याला बांबू” असा न्याय प्रशासनाकडून का??असा प्रश्न सर्वसामान्य सेवकरांना पडला आहे*

अविनाश देशमुख
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved