चहांद येथे शाळकरी विद्यार्थांमध्ये रंगला केंद्रस्तरीय क्रीडा सामन्यांचा थरार
जि.प.उच्च प्राथमिक शाळा चहांद ने मिळविला खेळ व क्रीडा महोत्सव साजरा करण्याचा मान
जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे (यवतमाळ)
राळेगाव:-यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या धानोरा केंद्रातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा चहांद ने खेळ व क्रीडा संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव द्वारे आयोजित केलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2023व 2024 चे नियोजन केले
सविस्तर या क्रीडा महोत्सवात धानोरा केंद्रातील अकरा शाळा सहभागी झाल्या होत्या त्यात चहांद, परसोडा, मु्धापूर, येवती, धानोरा, रानवड, वाठोडा, उंदरी, जागजाई, वनोजा, दापोरी या जि. प. शाळाचा समावेश होता. या खेळ व क्रीडा दरम्यान 11ते 14 वयोगटातील शाळकरी विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले होते.
खेळामध्ये कबड्डी, खो -खो, लंगडी, बॅटमिनटंन, धावणे, उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, आदी. खेळाचा समावेश करण्यात आला होता.यामध्ये सर्वाधिक बक्षीस येवती शाळेने सर्व खेळ मिळून एकूण 10 बक्षीस पटकविले तर दुसऱ्या क्रं वर सर्वाधिक बक्षीस धानोरा संघ एकूण 6,तिसरा क्रं. वनोजा एकूण बक्षीस 5, चौथा क्रं. चहांद शाळेने एकूण 4बक्षीस तर उंदरी संघाने 2बक्षिसे घेत विजय जल्लोष केला.या प्रसंगी खेळ व क्रीडा महोत्सवाचे उद्धघाटन चहांद चे सरपंच यांनी केले प्रमुख पाहुणे धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष पारधी,ग्रा. प. सदस्या सौ. सुदर्शना कांबळे, निखिल शेळके,
शाळा व्य. समिती माजी अध्यक्ष मनमोहन चांदेकर, उपाध्यक्ष भास्कर बोरकुटे क्रीडा प्रमुख सरोदे सर तर पंच म्हणून उईके मॅडम, वसुंधरा माकोडे,सुरकार मॅडम, तायडे मॅडम, नीलिमा पाटील, अनामिका पेटकर, रिना चौधरी, रत्नमाला धुर्वे, बारई मॅडम, कल्याणी फिस्के, भगत सर, कचरे सर, लांबट सर, हाते सर, रंगारी सर, देशमुख सर, भोयर सर, खंडाळकर सर, संदीप टूले आदी. काम पहिले तर खेळाचे नियोजन व सूत्र संचालन जि. प. उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खेमदास चिमणे सर यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख सुभाष पारधी यांनी केले सामने यशस्वी होण्याकरिता जि.प.शाळेचे शिक्षक खेरे सर, स्वप्नील सिडाम यांनी अथक परिश्रम घेतले तर मैदान सजावट कुंडलिक सातघरे व भोजन पाणी व्यवस्था सौ रंजना सातघरे यांनी केली.