Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मेट्रो सफारी

*प्रवाशांची साधला संवाद*

*मेट्रोचा वापर करण्याचे नागरिकांना आवाहन*

विशेष प्रतिनिधी – नागपूर 

नागपूर दि.१६:-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे व राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते.


मेट्रो रेल्वेकडून असलेल्या अपेक्षा व सूचना  पवार यांनी प्रवाशांकडून जाणून घेतल्या. मेट्रो रेल्वेमुळे वेळेची व पैशाची बचत होत असल्याचे सुमित मोरे या परभणी येथून नागपूरात नोकरीनिमित्त स्थायीक झालेल्या प्रवाशाने सांगितले. इतर प्रवाशांनी देखील मेट्रो बाबत समाधानी असल्याचे सांगितल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला.केंद्र व राज्य शासनाकडून मेट्रो रेल्वे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते, त्यानुसार प्रवाशांना आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याचे तसेच स्वच्छतेची सवय लावण्याच्या सूचना  पवार यांनी मेट्रोरेल्वे प्रशासनाला केल्या. तत्पुर्वी त्यांनी सिताबर्डी इंटरचेंज स्थानकाची पाहणी केली तसेच येथील दुकानदारांच्या समस्या जाणून घेतल्या.


*नागपूरच्या हिरवळीचे कौतुक*
प्रवासादरम्यान रेल्वेतून दिसत असलेल्या शहरातील विविध स्थळांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी  हर्डिकर यांचेकडून घेतली. नागपुरात सर्वत्र दिसत असलेल्या हिरवळीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शहिदांच्या चिमूर क्रांती भूमीला जिल्ह्याचा दर्जा केव्हा प्राप्त होणार

* सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक पटकाविणाऱ्या आमदार बंटी भांगडिया कडून चिमूर विधानसभा वासीयांची चिमूर जिल्हाची आशा …

सीडीसीसी बैंक नोकर भरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण लागू करा

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे मनसेची मागणी जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved