Breaking News

शेवगाव शहरांमध्ये चोऱ्या माऱ्या वाढल्या शेवगाव पोलिसांची वाढली डोकेदुखी

शेवगाव शहरातील नित्यसेवा चौकामधून चोरट्यांनी लांबविले एक लाख 75 हजार रुपये आरोपी सी.सी. टीव्ही मध्ये कैद

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव

शेवगांव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की काल दुपारी दोनच्या सुमारास नित्यसेवा चौकामधील गेवराई रोड परिसरात हॉटेल लकी चायनीज च्या आसपास दोन संशयित आरोपींनी सुमारे पावणे दोन लाख रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे दिवसा ढवळ्या चोरून नेली याबाबत आज सकाळी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादी नामे राम श्रीधर देवढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घटना काल दिनांक 18.12.2023 वार सोमवार दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन संशयित आरोपींनी पाळत ठेवून रक्कम 175000 व दुकानाचे शॉप ॲक्ट लायसन मोबाईलचे चार्जर आधार कार्ड पॅन कार्ड व महत्त्वाच्या झेरॉक्स कॉपीज वर्णन असलेल्या पिशवीवर किसान अग्रो सातारा फलटण नाव होते,

ब्राऊन कलर ची पिशवी होती. असा ऐवज चोरून नेला याबाबत भादवि कलम 379 प्रमाणे अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्या दूचाकी वरून चोरी करायला आरोपी आले होते त्याची नंबर प्लेट कोरी होती गजबजलेल्या नित्यसेवा परिसरामध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरांमध्ये अलीकडे बसस्थानका मध्ये चेंण सन्याचिंग पाकीट मारी आणि जबरी चोरीचे प्रमाण वाढले आहे चोरांना पोलिसांचा धाक राहिला नाही सीसीटीव्ही मध्ये आरोपी निदर्शनास येऊ नये यासाठी तोंडाला मास्क बांधून भामटे चोऱ्या करत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved