Breaking News

अवैध मुरूम उपसा करणाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करणार का?

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर तालुक्यातील गोंदोडा वडसी परीसरातील टेकडीवर अवैध मुरुमाचे उत्खनन अनेक दिवसा पासून सुरू असून दिनांक 18 डिसेंबरला अवैधरित्या मुरूम उपसावर महसूल विभागाने उशिरा का होईना कारवाईचा बडगा उगारला आहे. दरम्यान, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून विनापरवाना हजारो ब्रास मुरमाचा उपसा करणारे व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियमांना तिलांजली देत कंपनी पोकॅलंड मशीन चार ट्रक साह्याने अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे गौणखनिजाचे उत्खनन करत आहे. गौणखनिजाची लूट करणाऱ्या व्यावसायिकांवर राजकीय वरदहस्त असल्याने महसूल विभागाकडून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी नेहमीच महसूल यंत्रणेकडून कानाडोळा केला जात होता, गोंदोडा वडसी परीसरात अवैध मुरूम उत्खननाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची बाब महसूल विभागाच्या कानावर पडताच झोपेचे सोंग घेतलेल्या महसूल विभागाला जाग आली. संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय बनल्यानंतर महसूल विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला.

सकाळ पासून मुरूम उपसा सुरू होता मात्र महसूल विभाग येणार असल्याची भनक लागताच सदर उपसा करणाऱ्या कंपनीने काम थांबवून ट्रक व पोकलंड मशीन उभी ठेवली यामुळे कारवाई झाली नाही या आगोदर ही या कंपनीने अनेकदा मुरमाचा उपसा केला आणि विना रायल्टी काम केल्याचा आरोप नागरिकांनी केला तेव्हा सदर कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सदर ठिकाणी महसूल विभागाने उत्खनंन केलेल्या जागेचा पंचनामा केला असून घटनास्थळी उभ्या असलेल्या मशीन व ट्रकला हाकलून लावले असून सदर अहवाल वरिष्ठ महसूल विभागाला सादर केले आहे यावेळी महसूल मंडळ अधिकारी कुंभरे तलाठी ठाकरे आणि त्याचे सहकारी उपस्थित होते,महसूल विभाग कुठली कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved