जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा) – लोक स्वराज्य पार्टी’ महाराष्ट्र राज्य (ओ.बी.सी. बेस व बहुजनवादी) च्या वतीने लोक स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोक स्वराज्य पार्टीचे जिल्हा कार्यालय खात रोड भंडारा येथे तालुका बैठक नुकतीच घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी लोक स्वराज्य पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष किसन शेंडे होते. त्यावेळी लोक स्वराज्य पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुरेश भवसागर, लोक स्वराज्य पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रिती भिलकर, कोषाध्यक्ष माधवराव फसाटे, अ.पा. मेश्राम, सेवकराम शेंडे, वामनराव गोंधूळे, विलास केजरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी निष्काम कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून गाडगे महाराज यांची ६७ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. नंतर बैठकीत पक्ष वाढीकरिता चर्चा, गावागावात सभासद नोंदणी करावे. तसेच पक्ष कार्यकर्ता मेळावा घेणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.सभेच्या यशस्वीतेकरिता धर्मराज कंगाले, अधिरा शेंडे, देवांग शेंडे व तालुक्यातील लोक स्वराज्य पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.