Breaking News

शिक्षक भारती नागपूर विभागीय कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी सुरेश डांगे तर सरचिटणीसपदी शरद काकडे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात शिक्षणाच्या हक्कासाठी शिक्षकांच्या सन्मानासाठी हे ब्रीद घेऊन शिक्षकांच्या न्यायासाठी लढणा-या शिक्षक भारती संघटनेची नागपूर विभागाची कार्यकारिणी राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांनी अलिकडेच जाहीर केली.

या कार्यकारिणीत विभागीय अध्यक्ष सुरेश डांगे(चंद्रपूर),सरचिटणीस शरद काकडे(नागपूर), उपाध्यक्ष गुलाबराव मौदेकर(गोंदिया),संजय मेश्राम(गडचिरोली),कमलेश दुपारे(भंडारा),राजू भिवगडे(नागपूर),
सहसरचिटणीस नंदकिशोर कातुरे(नागपूर),प्रसिद्धीप्रमुख संतोष बाऱ्हेवार(गोंदिया),कोषाध्यक्ष मनोजकुमार नांदगाये(गोंदिया),महिला अध्यक्ष नलिनी नागरिकर(गोंदिया),महिला सरचिटणीस आशा दाकोटे(गडचिरोली) यांचा समावेश आहे.आमदार कपिल पाटील यांचे मार्गदर्शनात आणि राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड यांचे नेतृत्वात शिक्षक भारतीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यास आम्ही कटीबद्ध असल्याचे कार्यकारिणीतील सदस्यांनी म्हटले आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीचे राज्य अध्यक्ष नवनाथ गेंड,कार्याध्यक्ष दिनेश खोसे,सरचिटणीस भरत शेलार,उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर,महिला अध्यक्ष स्वाती बेंडभर आदींनी अभिनंदन केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

समाज हादरवणारा रहस्यमय ‘ॲसिड’ चित्रपट

मुंबई-राम कोडींलकर मुंबई:-स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून …

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved