विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-सर्वसामान्य कष्टकरी लोकांना अंत्योदय धान्य योजना प्राधान्य लाभार्थी योजना पंतप्रधान अन्नधान्य वितरण आदी योजनांच्या अंतर्गत तहसील कार्यालय व स्वस्त धान्य पुरवठा विभाग यांच्यामार्फत स्वस्त धान्य वितरण केले जाते परंतु ऑनलाइन पुरवठा होऊ नये पॉस मशीन मधील बिघाड मानवी हस्तक्षेप वितरण व्यवस्थेतील त्रुटी यामुळे शिधापत्रिकाधारक मेटाकुटीला आला आहे विभक्त कुटुंब करणे शिधापत्रिका ऑनलाईन करणे ऑनलाइन झालेली शिधापत्रिका पी एच एच यामध्ये समाविष्ट करणे आदि कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांना तहसील कार्यालय पुरवठा विभाग ऑनलाइन व्यवस्था या ठिकाणी कायम हेलपाटे मारत बसावे लागणार नाही.
शिधापत्रिकेचे सर्व कामे ऑनलाईन व्हायला पाहिजेत सेतु कार्यालयात
नविन शिधापत्रिका, विभक्त शिधापत्रिका, नाव कमी करणे, नाव सामाविष्ट करणे, सर्वत्र ई शिधापत्रिका योजना लागु झाल्यास लाभार्थी योजनेत बोगस नावे वाढवणे व इतर गैरप्रकार बंद होतील दलाली बंद होवून सर्वसामान्यांची ससेहोलपट बंद होईल पुरवठा विभागातून शिधापत्रिके चे अर्ज गहाळ झाले किंवा शिधापत्रिका गहाळ झाल्या अश्या तक्रारी हि राहणार नाही,प्रशासनास विनंती आहे कि सर्वत्र ई शिधापत्रिका योजना लागु करावी.
*ताजा कलम*
*इ. पी. डी. एस.च्या विविध योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना कोरोना पासून सर्वसाधारण पणे महिन्यातून दोनदा शिधावाटप केले जाते व सणावाराला आनंदाचा शिधा चे किट दिले जाते वितरण व्यवस्थेतील व वाटपातील काही झारीतील शुक्राचार्य कायम गैरफायदा घेताना दिसत आहेत त्यांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण???*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*