Breaking News

शेवगाव तहसील कार्यालयात जप्त केलेली चोरीची वाळू घरकुल धारकांना मोफत द्या

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-सोमवार दि 8 जानेवारी 2024 रोजी शेवगाव चे तहसीलदार प्रशांत सांगडे यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे शिष्ठमंडळ समक्ष भेटून तहसील कार्यालयात चोरीची जप्त केलेल्या वाळूचा मोठा साठा झाला असून त्याची विल्हेवाट लावण्या साठी शेवगाव शहर व तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर झालेले असून वाळू अभावी लाभार्थ्यांना काम करणे अवघड झाले आहे.

त्यांनाही बांधकामासाठी चोरून वाळू चढ्या भावाने घ्यावी लागते त्यामुळे आपल्या कार्यालयातील जप्त केलेल्या या वाळूची घरकुल धारक लाभार्थ्यांना मोफत देऊन विल्हेवाट लावावी म्हणजे तहसील कार्यालयातील साठाही कमी होईल व घरकुलधारकांना घरकुलांचे कामही तात्काळ होतील अशी मागणी केली त्यानंतर तहसीलदार प्रशांत सांगडे यांनीही वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागणीला क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ मान्यता देऊन घरकुलधारकांनी गटविकास अधिकाऱ्यांचे घरकुल कार्यारंभाचे पत्र घेऊन यावे त्यांना एका घरकुल साठी पाच ब्रास मोफत वाळू दिली जाईल फक्त वाहतुकीचा खर्च संबंधित घरकुल धारकाला करावा लागेल असे तहसीलदार सांगडे म्हणाले.

तहसीलदारांनी घेतलेल्या निर्णयाचे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी कौतुक करून, असे अधिकारी असतील तर निश्चितच सर्वसामान्य लोकांना प्रशासनाकडून न्याय मिळेल तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची आज गरज आहे, असे सामाजिक भान ठेवून चांगले काम करणारे अधिकाऱ्यांसोबत
वंचित बहुजन आघाडी कायम पाठीशी होती आहे आणि भविष्यातही राहील असेही प्रा किसन चव्हाण म्हणाले, यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रविन्द्र निळ,गोरख तुपविहीरे, अरविंद साळवे व ईतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

*ताजा कलम*

यापूर्वी शेवगाव तहसील कार्यालयाने शेकडो ब्रास वाळू जप्त केली परंतु तिचे पुढे काय झाले ही माहिती कधी बाहेरच आली नाही वास्तविक पाहता जप्त केलेल्या गौण खनिजाचा रीतसर लिलाव करून ती रक्कम महसूल शासनाकडे रीतसर जमा केली जाते परंतु महसूल चे काही झारीतील शुक्रा चार्य ती वाळू आपल्या बगल बच्याना खिरापती सारखी वाटत होते अशी चर्चा दबक्या आवाजात शेवगाव शहरात व तालुक्यात सुरू आहे शेवगाव चेक कर्तव्यदक्ष तहसीलदार श्री प्रशांत सांगडे यांनी मात्र या सर्व अनिष्ट प्रथांना छेद देऊन शहरातील व तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या हिताचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

खडबडून जागे झाले एस. टी. प्रशासन नवीन बांधकाम त्वरित पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू

गेली सहा वर्षे रेंगाळलेले शेवगाव बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात “मी शेवगावकर” च्या दणक्यामुळे आगार …

देवटाकळी हिंगणगाव जोरापुर रस्त्याच्या कामासंदर्भात केंद्रीय ग्रामीण रस्ते विकास खात्याचे संतोष पवार कनिष्ठ अभियंता { पंतप्रधान ग्राम सडक योजना } अहमदनगर यांनी केला खुलासा

मातीच्या भागामधून जात असल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा (Soil Stabilization अंतर्गत FDR) या तंत्र ज्ञानाचा वापर करून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved