जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणेचे सहकारी शैक्षणिक उपक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड लि. चंद्रपूरचे वतीने व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर चे विद्यमाने चिमुर त. चिमुर जि. चंद्रपूर येथे चिमुर तालुक्यातील नागरी/ग्रामीण व पगारदार सहकारी पतपुरवठा सह. संस्थांचे संचालक व सेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे सभागृहात संपन्न झाले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणात सहकरी कायदा, संचालक मंडळ अधिकार, कामे व जबाबदारी, सहकरी संस्थेचे कायदेशीर व्यवस्थापण, पतसंस्था नियामक मंडळ तरतुदी, ताळेबंद विषलेशन, एन.पी.ए.व थकित कर्जवसुली प्रक्रिया, ईत्यादी विषयावर भारत. सी. फलके, जिल्हा सहकार विकास अधिकारी, जिल्हा सह. प्रशिक्षण बोर्ड मर्यादित. चंद्रपूर, राजेश लांडगे, उपलेखापरीक्षक-सह.संस्था तसेच व्हाईस ऑफ मिडिया चंद्रपूर चे जिल्हा सरचिटणीस व सी. टि. व्ही. प्रतिनिधी श्रीहरी सातपुते, एन. मेहरकुरे, श्री. पैठे सह.विभाग यांचे मार्गदर्शन झाले. कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. अनेक प्रशिक्षणार्थी प्रतिनिधींनी मनोगतात सदरील प्रशिक्षणात अत्यंत उपयुक्त माहिती मिळाल्याचे अभिप्राय दिले. प्रशिक्षण पुरती नंतर प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आले.