Breaking News

गरिब, गरजवंता साथी मुंबईकरांनो पुढाकार घ्या,-के. रवीदादा यांची भावनिक साद

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई:-भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील गरीब, गरजूवतांसाठी मुंबईकरांनी पुढाकार घ्यावा, सहकार्यासाठी मदतीला धावून यावे, अशी भावनिक साद इंडिया मिडीया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर के रवीदादा यांनी बोलताना सर्वसामान्यांना घातली आहे.भारताच्या ७५ व्या सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला केईएम, टाटा रुग्णालय परिसरात मॅनेजमेंटच्या माध्यमातून ध्वजारोहण आणि ब्लॅंकेट, फराळ किट आकर्षक तिरंगा ध्वजचे वाटप कार्यक्रम आयोजित करतात आला होता. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक अनिल कोकीळ, ज्युनियर अभिनेता अनिल कपूर, फिरोज खान, राजेश खन्ना, अभिनेत्री ऐश्वर्या, अॅड. वैशाली बोरुडे , बाळा ब्रह्मभट, बंडू लोंढे, अभिनेता राहुल रवी आदि उपस्थित होते.

टाटा, केईएम रुग्णालय परिसरात राहणा-या रुग्ण व त्यांच्या नातवाईकांना थंडीपासून बचाव व्हावा, यासाठी ब्लॅंकेट किटचे वाटप गेल्या १०वर्षापासून सुरु असून या ११ व्या वर्षीही हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला.परळ येथून सुरु ‌झालेला हा ब्लॅंकेट वाटपाचा उपक्रम भायखळा येथे आल्यानंतर गरजू महिलेला या उपक्रमाद्वारे दिलेल्या भेटवस्तूचा तिने स्वीकार करून के रवी दादा यांचे मनःपूर्वक आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात गेल्यानंतर रस्त्यावर झोपलेल्या गरीब नागरिकाला मदतीचे सहकार्य केल्यानंतर तो भारावून गेला. यावेळी ही सर्व दृश्य डोळ्यांनी पाहणाऱ्या फ्रेंच विदेशी नागरिकाने या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

के. रवीदादा म्हणाले की, १० वर्षापूर्वी नागरिकांना मदत करण्याचा हा उपक्रम दरवर्षी आम्ही राबवीत आहोत. प्रत्येक वेळी सरकारी ,प्रशासकीय यंत्रणा व उद्यमी कामाला येईल, असे नाही, परंतू नागरिकांचीही काही कर्तव्य आहेत, ती आपण नित्यनियमाने पार पाडली पाहिजे. त्यासाठी मुंबईकरांनी गरजूवंतासाठी सहकार्याचा हात पुढे केला तर नक्कीच प्रत्येक गरजूवंत गरिबांचा आशीर्वाद मिळेल. त्याच बरोबर मुंबईकरांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल, यावेळी अभिनेता राहुल रवी मार्गदर्शन करताना म्हणाले की, माझे वडील के रवी दादा यांनी सुरू केलेला हा सामाजिक उपक्रम पुढील १११ वर्षे सुरू राहील, असा आशावादी अभिनेता राहुल रवी यांनी बोलताना व्यक्त केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संवादक वरिष्ठ पत्रकार तानाजी कांबळे, पोलीस निरीक्षक सुशील जाधव, पत्रकार राजेंद्र साळस्कर, पत्रकार उदय पवार, अरविंद पटकुरे, बाळा वाडियार, शरद रणपिसे, पत्रकार महादू पवार, पत्रकार जगदीश काशिकर, विलास घडशी, राम तांबे, राहुल खैरे, रमजान सिद्दिकी, महेंद्र शिर्के, फोटोग्राफर दिनेश परीशा, पत्रकार पुष्कर, सुरज मंडल, दिलीप बैरी, कोविल नाडर, कुन्नू यादव पोलीस ठाण्याचे आदी मान्यवरांनी सहकार्य केले. यावेळी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता शिंदे, उपोनि विशाल देवरे यांचे सहकार्य मिळाले. या सामाजिक उपक्रमामध्ये केईएम व टाटा रुग्णालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता पहाटे चार वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे झाली. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने ही सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अखेर शेवगांव पोलीस स्टेशनमध्ये दोन शेअर ट्रेडिंगचे गुन्हे दाखल

प्रदीर्घ लढ्याला यश महेश हरवणे महाराज आणि शिसोदिया बंधु यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल विशेष …

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाबरोबर त्यांचे संवर्धन करावे- निरीक्षक घनश्याम खराबे

बेलगाव येथे वृक्षारोपण व ११ हजार १११ विविध प्रजातींचे वितरण जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण मो.9665175674 (भंडारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved