जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-लावणी नृत्य. आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच. क्रीडा स्पर्धा. पालक मेळावा. नाटक, विविध वेशभूषा सादर करत चिमूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.जिल्हा परिषद शाळेने नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे या वर्षी ‘जल्लोष’ हे वार्षिक स्नेहसंमेलन काल दिनांक २६ जानेवारीला दुपारी दोन वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.
या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील, यासाठी मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे. सहायक शिक्षिका सरिता गाडगे. शिक्षण सेविका सोनू कामडी शिक्षकांनी प्रयत्न केले. या संमेलनाला विद्यार्थी,पालक आणि नागरिकांनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून काही पालकांनी आपल्या पाल्याचे कौतुक म्हणून बक्षीस देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार केले जावेत, अशी अपेक्षा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांनी व्यक्त केली. रवी बावनकर. सुभाष मोहिनकर. राजू बालमवार. सोपान रामटेके. रोशन नागोसे,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता गाडगे यांनी केले.तर प्रस्था्विक मुख्याध्यापिका छाया खोब्रागडे यांनी केले. शिक्षन सेविका सोनू कामडी. भाग्यश्री हिंगे. अश्विनी सातपुते. अस्मिता सातपुते. प्रतिमा दिघोरे. शीतल गायकवाड. अर्चना भजभुजे. वनिता नागोसे. रुपाली जुमडे. शीतल लांजेवार. सिंधू मोहिनकर. वृंदा दांभेकर. सुरेखा डहारे. वैशाली मीसार. पिंकी सातपैसे यांनी मोलाचे सहकार्य केले.