Breaking News

शेवगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव ता. 31 जानेवारी 2023 अनंत श्री विभूषित आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज याचा पादुका दर्शन सोहळा खंडोबा मैदान, शेवगाव येथे 5 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी ठीक 09:00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात, जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान रक्तदान शिबिर, मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ५२ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिर
आयोजित केले जातात.

राज्यात विविध महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांना प्राण गमवावा लागतो म्हणून त्यांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते जेणेकरून त्यांना जीवनदान मिळेल नेमका हाच धागा पकडून जगद्गुरुश्रींनी या सेवेचा प्रारंभ केला आहे. या सेवेला १४ वर्षे पूर्ण होत आहेत. आज पर्यंत या सेवेच्या माध्यमातून वीस हजाराच्या वर रुग्णांचे प्राण वाचले आहे. या पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी पादुका, गुरुपुजन सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन,सामाजिक उपक्रम, गुरुपुजन, आरती सोहळा,प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे.

तरी या पादुका दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमास संपूर्ण जिल्हा सेवा समिती, पीठ समिती सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष तालुका सेवा समिती सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती युवा सेना, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, गुरु सेवक, प्रोटोकॉल अधिकारी ,प्रवचनकार, जिल्ह्यातील सर्व आजी व माजी पदाधिकारी उपासक साधक शिष्य, भक्तगण, हितचिंतक जिल्ह्यातील सर्व गुरु बंधू व गुरु भगिनी यांनी कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने श्री. सोमेश्वर घोगरे, निरीक्षक, सागर तिखे, जिल्हाध्यक्ष
जिल्हा सेवा समिती अहमदनगर दक्षिण यांनी केले आहे. पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार अहमदनगर दक्षिण जिल्ह्यातील शेवगाव, नगर, पाथर्डी, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत तालुक्यातील सेवा समीती सदस्य गावागावात जावून भेटी घेऊन प्रचार प्रसार करीत आहेत.

*ताजा कलम*

*शेवगाव शहरातील खंडोबा नगर भागात आणि संपूर्ण शहरांमध्ये अतिशय भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे पादुका दर्शन सोहळ्यासाठी हजारो भक्तांची सोय करण्यासाठी जिल्हा सेवा समिती तत्परतेने कार्य पार पडत आहे शेवगाव शहर आणि तालुक्यातील भाविक भक्त सढळ हाताने मदत करत आहेत*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामाने शिक्षक त्रस्त : सुरेश डांगे

सेवानिवृत्तीनिमित्त रावन शेरकुरे आणि प्रमोद मायकुरकर यांचा शिक्षक भारतीतर्फे सत्कार जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-भावी पिढी …

मातृतिर्थ सिंदखेड राजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. च्या शेकडो गुंतवणूकदारांना आधी मी कमवीन मग तुमचे पैसे फेडील

मातृ तीर्थ सिंदखेडराजा को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ज्या त्या मुख्य संचालकाचे सोशल मीडियावर गुंतवणूक दारांना थांबा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved