Breaking News

भंडारा येथे १० व ११ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा) – खेलो इंडिया खेलो यांच्या मान्यतेने जिल्हा युथ गेम असोसिएशनच्या वतीने शनिवार दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ ला सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलन भंडारा येथे करण्यात आले आहे.राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल बावनकर, सुनील फुंडे, आमदार डॉ . परिणय फुके, सामाजिक कार्यकर्त्या पूजा ठवकर, कॉग्रेसचे महासचिव धनंजय तिरपुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, माजी सभापती कलाम शेख, जॅकी रावलानी, विवेक पडोळे, योगासन असोसिएशनचे जिल्हा समन्वयक धनंजय बिरणवार, सुभाष आजवले, बालु ठवकर, रामचंद्र आगाशे, एकवीध संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत इलमे, ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष मंगेश वंजारी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय स्पर्धा शनिवार दिनांक १० फेब्रुवारीला कुस्ती, कबड्डी, बॉक्सिंग, बॅडमिंटन, लुडो, बास्केटबॉल, क्रिकेट, योगा, स्विमिंग, फुटबाॅल, कराटे, तायक्वांदो, इत्यादी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. तसेच रविवार दिनांक ११ फेब्रुवारी ला चेस व ॲथलेटिक्स स्पर्धेत १०० मी. २०० मी. ४०० मी. ८०० मी. १५०० मी., ५,००० मी. १०,००० मी. ४ बाय १०० मी रीले. व दत्याय ४०० मी. रीले. तसेच लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, हैमर थ्रो, तिहेरी उडी इत्यादी क्रीडा होणार आहेत.स्पर्धेकरिता खेळाडू पुरुष व महिला गटात भाग घेण्याचे आवाहन अशोक बन्सोड, सुशी पाल, विकास बागडे, आशिष चुटे, क्रीडा मार्गदर्शक विलास केजरकर, सोनी खन्ना, सुगात शेंडे व सुनिल पंचबुधे, साक्षी शहारे, सीमा आगाशे, प्रशांत मुंडले, अमित मडावी, उमेश मोहतुरे, सतिश सार्वे व भंडारा जिल्हा युथ गेम असोसिएशनचे सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved