Breaking News

मजुरांच्या वाहनाला अपघात 14 महिला गंभीर जखमी तर 4 महिलांचा मृत्यू

चिमूर विधानसभा समन्वयक डॉ.सतिश वारजूकर घटनास्थळी दाखल होऊन जखमी महिलांवर केला उपचार

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर:-एका गावातून दुसऱ्या गावी मजुरीने शेतीच्या कामासाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या वाहनाला अपघात झाला. चार चाकी गाडी पलटी झाल्याने वाहनातील 13 महिला मजूर गंभीर जखमी झाल्या तर तीन महिला जागीच मृत पावल्या जखमींना तातडीने सिर्सी येथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज पाठवण्यात आले

समुद्रपूर तालुक्यातील सिर्सी उमरेड रोडवर सिर्सी येथून 3 जवळपास किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असून गावात मजूर मिळत नसल्याने दुसऱ्या गावातून शेती कामासाठी मजूर आणले जातात याकरिता वाहनांची सुविधा केली जात असते अशाच प्रकारे चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर [खरबी ] गावातून एकूण 17 महिला चार चाकी सुमो गाडीने सिर्सी जवळील पिपरी येथे चना कापण्यासाठी गेले असता व गावी परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली व जखमी महिलांना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठवण्यात आले महिला गंभीरित्या जखमी असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठवण्यात आले व स्वतः डॉ. सतिशभाऊ वारजुकर हे शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे जाऊन जखमी महिलांवर उपचार सुरू करण्याची व्यवस्था करून दिली

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कृपया लक्ष द्या – हरवले आहेत

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव शेवगाव:-गेल्या पंधरा दिवसापासून राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता पायी घराबाहेर …

14 मे पर्यंत जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी

नागरिकांनी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved