Breaking News

कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळा संस्कृती व परंपरा जपून अगदी शिष्टबद्द व उत्कृष्टपणे जल्लोषात पार पडला

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर / भद्रावती :- श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती तर्फे दोन दिवसीय कृतिशील शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संघटनेच्या प्रमुख मार्गदर्शक निखिल बावणे, अभि उमरे, स्वप्नील मोहितकर व युगल ठेंगे यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात आला.यावेळी पहिल्या दिवशी दि.१८/२/२४ रोजी स्थानिक भद्रावती या ठिकाणी श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दोन दिवशीय चालणाऱ्या या महोत्सव मध्ये दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोज रविवारला निळकंठराव शिंदे वरिष्ठ महाविद्यालय भद्रावती या ठिकाणी भद्रावती शहरातील विद्यार्थ्यांकरिता वर्ग चार ते आठ पर्यंत अ गट तसेच इयत्ता नववी ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ब गट असे विभाजन करून निबंध स्पर्धा घेण्यात आली.

विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची जाणीव ठेवण्याकरिता घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 70 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. सदर निबंध स्पर्धेचे परीक्षण प्रा.अमोल ठाकरे यांनी केले. अ गटातून रेणुका दंडेलवार, सिद्धी घडले, श्रावस्ती रामटेके,अनुराग बलकी तर ब गटातून हरिप्रिया बाभुळकर, यश लेडांगे, सुमित कोटजावरे, राज कामातवार इत्यादींनी अनुक्रमे प्रथम , द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर क्रमांक मिळविला.दुसऱ्या दिवशी दि. १९/२/२०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त नगरपरिषद भद्रावती या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून, ध्वजारोहण करून व पारंपरिक शिवगर्जना देऊन मानवंदना देण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मौलिक विचार व्यक्त केले. तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत ठरलेली रोख स्वरूपातील रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.नंतर नगर परिषद भद्रावती ते नाग मंदिर भद्रावती पासून परत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वारापर्यंत पारंपारिक व सांस्कृतिक जोपासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. निघणाऱ्या या विशाल शोभायात्रे मध्ये मिरवणुकीचे मुख्य आकर्षण स्वागत बँड पथक, दुर्गा वाहिनी महिला मंडळ, ध्वज पथक, लेझीम पथक पालखी, बाल गोपाल , महिला व पुरुष पारंपरिक वेशभूषा, विविध शिवकालीन देखावे, संतांच्या झाख्या, महापुरुषाची वेशभूषा व महाराजांच्या गाण्याचा ताल डिजे व दुमदुमत होता. तसेच विविध भजन मंडळ ,बैलगाड्याआणि शेतकरी बांधव सहभागी झाल्याने अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती  राजेश वारलूजी बेलेअध्यक्ष संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्था चंद्रपूर , किशोरदादा टोंगे,राहुलदादा बालमवार, पोलिस स्टे. कर्मचारी बांधव , नगर परिषद भद्रावती चे सव कर्मचारी व नगर सेवक सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, प्रत्येक शाळा, कॉलेज, ट्युशन चे शिक्षक व विद्यार्थी, जेष्ठ वरिष्ठ तसेच भद्रावती नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संघटनेचे सदस्य मनीष बुच्चे, शुभम शेलार, निखिल सहारे, वैभव बावणे, निखिल उगे, शिवम पारखी, प्रतिक सहारे, साहिल बोनागिरी , डिंकू पांडे, ऋषी वरखडे,साहिल वालदे ,यश लेडागे, रोहित मेश्राम, तनिष पाटील, सक्षम बोरकुटे, अनुज आगलावे, प्रविण गिरोले, साहिल आसकर, अमित उगे,हिमांशू काथवटे,अंकित रायपुरे, साहिल तांगडपल्लीवार प्रीत शेंडाम, ओम टोंगे, तनिष पाटील, सक्षम बोरकुटे,प्रशांत बावणे, चेतन मांढरे, आकाश ठेंगे, अर्पित मंडवगडे, जीवन सैताने, गिरीष मोघे, शिवम पारखी यांच्यासह संपूर्ण शिवशंभू पाईक यांनी अथक परिश्रम घेतले व सर्वांचे सहकार्य लाभले.

सर्वांचे मनःपूर्वक जाहीर आभार व धन्यवाद.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विविध लोकांसंग लग्न करून ती करते फसवणूक – तक्रार दाखल

शेवगाव तालुक्यातील देवटाकळीच्या फसवणूक झालेल्या तरुणाची पोलीस प्रशासनाकडे तक्रार लाखो रुपयांना गंडा घालून खरडगाव ची …

76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर : -जिल्ह्यात खरीप हंगाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved