Breaking News

विद्यार्थ्यांनो,शिवरायांच्या मावळ्यांनी स्पर्धा परीक्षेचे किल्ले जिंकावे – राहुल डोंगरे

शारदा विद्यालयात प्रतिपादन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा) – छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा,कुशल संघटक,लोक कल्याणकारी राजा,नव्या युगाचा निर्माण करणारा,दुर्जनांचा नाश करता, सज्जन्नाचा कैवारी,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हे देशाचे आदर्श आहेत.वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अमावस्याला गनिमी काव्याने हल्ले करून अनेक युद्ध जिंकले.शेकडो किल्ले जिंकले.ते बहुगुन संपन्न ,शुर,बुद्धिमान,दयाळू शासक होते.त्यांच्या सैन्यात मुस्लिम विर आणि लढवय्ये होते.ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते.जातीय वादात लोक अडवावे हे त्यांना मान्य नव्हते.स्त्रियांच्या आदराचे कट्टर समर्थक होते.त्यांच्या विचारांची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे.विद्यार्थ्यांनो,अठरा पकड जातीच्या शिवरायांच्या मावळ्यांनी आज उच्च शिक्षण घ्यावे, U.P.S.C आणि M.P. S.C.स्पर्धा परीक्षेचे वर्तमानातील मोठे किल्ले जिंकावे व प्रशासनात येवून लोक कल्याण करावे असे प्रतिपादन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले.ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय तुमसर येथे अध्यक्ष पदावरून बोलत होते.

कार्यक्रमाचे अतिथी वासू चरडे होते.या प्रसंगी युगश्री उके,वैभव वासनिक, पायस मोहतुरे, दक्ष भांडके,संस्कार चौधरी, शुयश सोळंकी,वरून काटवले,नोकेश भोयर,रींशू देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विचारातून अभिवादन केले.श्रद्धा सव्वालाखे,अरोही उपरीकर,खुशाली रहांगडाले,लाची लांजेवार, ऋतुजा तिरपुडे,अश्विनी तुरकर यांनी दोनच राजे इथे जाहले हे गीत सादर केले.मीनल कांबळे,सानिया ठवकर ,धनश्री हिंगणे, निहारिका टांगले,सोनाक्षी धारंगे,तनुश्री हटवार,अनुश्री काहलकर ह्यांनी पोवाडा सादर करून छत्रपती शिवरायांचे कार्याला उजाळा दिला.प्रगती सिंगनजुडे,फ्रांसी उखरे,विशाखा पटले, पूर्वा मोटघरे,मानसी सपाटे ह्यांनी हलवा पाळणा बाळ शिवाजींचा गीतांवर नृत्य सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रगती सिंगनजुडे हिने केले तर आभार फनिकेश शेंडे यांनी मानले. पूजा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाबिरप्रसाद आग्रवाल,सचिव रामकुमार आग्रवाल यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी दिपक गडपायले, संजय बावनकर, रुपराम हरडे,श्रीराम शेंडे,नितूवर्षा घटारे,प्रीती भोयर,विद्या मस्के,सीमा मेश्राम,नलिनी देशमुख, सुकांक्षा भुरे,अशोक खंगार,प्रशांत जीवतोडे, अंकलेश तिजारे,नारायण मोहनकर,दिपक बालपांडे,झांकेश्वरी सोनेवाणे आदींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved