Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त शेवगाव शहरातील मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालय मध्ये घुले पाटील मेडिकल फाउंडेशन मार्फत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755

शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की *आज 8 मार्च 2024 रोजी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी जागतिक महिला दिनानिमित्त गृहपयोगी वस्तुंचे वाटप, महिला संवाद मेळावा ,व मोफत महिलांसाठी आरोग्य शिबीर या संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन महाशिवरात्रीच्या महान पर्वणीवर आयोजीत करण्यात आला प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध संस्थांनी कार्यक्रम आयोजित केले होते. प्रत्येक स्त्री ही तिच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जीव झोकून आपले सर्वस्व देत असते. कुटुंबाची जबाबदारी, मुलांचे संगोपन, करिअर, मित्रमंडळ, सासर-माहेर, वडीलधाऱ्यांचा सांभाळ अशा अनेक जबाबदाऱ्या ती सांभाळून ती पार पाडत असते. मात्र या सर्व गोष्टींमध्ये तिच्या तब्येतीची काळजी घेण्याची ती टाळाटाळ करते.ती आहे म्हणून हे विश्व आहे ती आहे.

म्हणून घराला घरपण आहे ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे* यावेळी डॉ. मेघा कांबळे सौ. आशा भोसले, रागिनीताई लांडे, संगीता देशमुख, सविता फडके, सौ. शुभदा देशमुख उज्वला मुंढे , सौ. सुनिता काथवटे, उषा नरवडे, सौ. बोडखे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग उपस्थित होत्या जिजामाता नर्सिंग कॉलेज भेंडा प्राथमिक आरोग्य केंद्र शेवगाव चे कर्मचारी मेडिकल असोसिएशन शेवगाव यांचे डॉक्टर यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित महिला भगिनींचे आरोग्य तपासणी शिबिर मधुमेह रक्तातील एच बी व रक्तगट तपासणी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा घुले पाटील मेडिकल फाउंडेशन च्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक अशोक उगलमुगले यांनी केली तर सूत्रसंचालन नवजन नवजीवन विद्यालयाचे कुसारे सर यांनी केले.

*ताजा कलम*

*तालुक्यात हाती सत्ता नसताना गेली अनेक वर्ष सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवून स्वर्गीय मारुतराव घुले पाटील मेडिकल फाउंडेशन यांच्या विद्यमाणे कायम तालुक्यातील गोरगरीब लोकांची सेवा सुरू आहे स्वर्गीय मारुतराव घुले पाटलांनी घालून दिलेल्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत*

*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पञ्जर*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

राष्ट्रसंतांची संकल्पना रूजविण्यास शिबिर महत्त्वाचे – प्रतिकुमार टांगले

भिलेवाडा येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- स्पर्धेच्या युगात वावरत असतांना बहुतेक …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर : -भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved