Breaking News

बरडघाट येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-चिमूर पंचायत समिती अंतर्गत जि.प.प्रा.शाळा,बरडघाट येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्याकरिता सहविचार सभा घेण्यात आली.सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी कवडू बारेकर होते. मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये आणि जबाबदाऱ्या यासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. सहविचार सभेत पुढील दोन वर्षांकरिता शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली.अध्यक्षपदी कवडू बारेकर यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी साधना श्रीरामे यांची निवड करण्यात आली.

शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सोनाली मेश्राम,करुणा मेश्राम,सरिता भोयर,आशा पोईनकर,वैशाली दोडके,प्रभाकर दोडके,रामचंद्र बारेकर,रवींद्र बारेकर,रामचंद्र सहारे,ग्रामपंचायत प्रतिनिधी सुरेश सहारे,शिक्षक प्रतिनिधी अर्चना डफ,विद्यार्थी प्रतिनिधी साक्षी पोईनकर,पियुष दोडके यांची निवड करण्यात आली.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.सहविचार सभेला अंगणवाडी सेविका पदमाताई रिनके,मदतनीस सुवर्णा भोयर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved