Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान व गृहउद्योग एक दिवसीय मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- शिलवंत बहुउद्देशिय विकास संस्था, जाख भंडारा व युवा परिवर्तन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम डोंगरगाव (साक्षर), ता . लाखनी येथे रविवार दिनांक १०/०३/२०२४ रोज सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजता पर्यंत सार्वजनिक हनुमान मंदिर, डोंगरगाव (साक्षर) येथे ५० महिलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले.या प्रशिक्षणात निरमा, फिनाईल, भांडे लिक्वीड, हारपिक, व हॅंड वॉश या वस्तू कशा तयार करतात याचे प्रशिक्षण देऊन गृह उद्योग कसा निर्माण होईल याचे मार्गदर्शन शिलवंत घोडेस्वार सर(प्रशिक्षक) यांनी केले. व सर्व प्रशिक्षणार्थी यांना युवा परिवर्तन तर्फे प्रशिक्षण प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. शालुताई कठाने, उद्घाटिका सौ. रंजनाताई कठाने, द्वीपप्रज्वलन सौ. भाग्यश्रीताई शिवनकर, प्रमुख अतिथी, सौ. सविताताई मेश्राम, सौ. ललिताताई फुंडे, सौ माधुरीताई कठाने, सौ. शालिनीताई कठाने, सौ. पालिकाताई मोटघरे, सौ सुनंदाताई फुंडे, सौ. हिरकण्याताई दोनोडे, (सरपंच, डोंगरगाव), गंगाधर धुवाधपारे (अध्यक्ष, शिलवंत बहुउद्देशिय विकास संस्था, जाख, भंडारा), शिलवंत घोडेस्वार (उपाध्यक्ष, शिलवंत बहुउद्देशीय विकास संस्था जाख, भंडारा), तसेच सौ. उषा घोडेस्वार (युवा परिवर्तन, जिल्हा व्यवस्थापक, भंडारा) व संपूर्ण गावकरी महिला यांच्या उपस्थितीत डोंगरगाव येथे अतिशय जल्लोषात संपन्न झाला.

यावेळी प्रथम माता सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुप्षहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर डोंगरगाव येथील चिमुकल्यांनी सुमधुर आवाजात स्वागत गीताने प्रारंभ झाला.सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन दिपक मेश्राम यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्रियंकाताई लोणारे यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलीसांनी केला दारूसाठा जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर वरोरा :- पोलीसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करुन दारूसाठा जप्त केला असून याप्रकरणी …

जेतवन बुद्ध विहार मालेवाडा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि. 6 मे 2024 रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved