Breaking News

आदिवासी समाजाने संस्कृती सोबत शिक्षणाला प्राधान्य द्यावे- रोशन फुले

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)- लाखांदूर तालुक्यातील मौजा झरी येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा समिती व राणी दुर्गावती स्मारक समिती झरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 मार्च 2024 ला महामानव क्रांतीसुर्य बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळा तथा समाज प्रबोधन प्रसंगी उपस्थित आदिवासी (गोंड) समाजाला मार्गदर्शन करताना आदिवासी समाजाने संस्कृती सोबत शिक्षणाला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता तथा एस एस डी तालुका प्रमुख रोशन फुले यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले आदिवासी गोंड समाजाचा इतिहास हा शौर्याचा व पराक्रमाचा इतिहास आहे. महामांव बिरसा मुंडा यांनी वयाच्या २५ वर्षी समाजासाठी अमरत्व पत्करले.ते शिक्षित होते त्यामूळे त्यांनी क्रांती केली, शिक्षणामध्ये आपले जीवन बदलण्याची क्षमता असते, शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

महामानव क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष बि. एस. सय्याम , सा कार्य. यांचे हस्ते करण्यात आले उद्घाटक उत्तम भगडकर ता. कां, उपाध्यक्ष संजनाताई वरखडे,स.प.स,मार्गदर्शक कवळूजी पेंदाम, राजुजी मडावी, योगराज मडावी, कोकिळताई पेंदाम, संदीप कुळमते, प्रमूख पाहुणे अरविंद रामटेके, मानबिंदू दहीवले, अविनाश ब्राह्मणकर स.जी.प.,किशोर मंडाले सरपंच झरी,किशोर कन्नाके पो.पा. झरी, मर्कांड हुकरे दिघोरी,साधू उईके,दामाजी मडावी, शंकर चव्हारे सरपंच तसेच ईतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजुभाऊ मेश्राम, संचालन ब्रम्हानंद कोवे,तर आभार कृष्णा ब्राम्हनकर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे यसस्वीतेसाठी लक्ष्मण पोरतक, धनपाल सुरपाल, प्रफुल मडावी,हिवराज ब्राम्हनकर,सुमित कन्नाके त्याच प्रमाणे सर्व आदिवासी समाजाने व गावकरी मंडळीनीं सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ऐन उन्हाळ्यामध्ये शहरातील वीज ग्राहकांना महावितरण चा झटका

महावितरण मुंबई च्या भरारी पथकाची धडक कारवाई अनेकांची वीजचोरी पकडली मुंबईच्या भरारी पथकाने पकडले अनेक …

तिन महिन्यातच रस्ता उखरला- निकृष्ट दर्जाचे काम

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेला मौजा कोलारा तु हे पर्यटण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved