Breaking News

नागरिकांना पाहता येईल उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र

नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर दि. 20 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र नमुना – 26, नागरिकांना विविध कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईनसुध्दा पाहता येणार आहे.

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र नमुना – 26, नागरिकांच्या अवलोकनार्थ चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट जिल्हा परिषद कार्यालय, महानगरपालिका, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यालयांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा शपथपत्र नमुना- 26 अपलोड करण्यात येणार असल्यामुळे या संकेतस्थळावर देखील नागरिकांना शपथपत्र नमुना- 26 पाहता येईल.

13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता नामनिर्देशन पत्रे दिनांक 20 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) निवडणूक निर्णय अधिकारी, 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर यांचेकडे दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयातील कक्षामध्ये दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे वरील ठिकाणी कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 28 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (विस कलमी सभागृह) येथे सुरु करण्यात येईल.

ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावयाची असेल त्यांचे अर्ज 30 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उपरोक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येतील. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदान 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved