Breaking News

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडवावे- सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर

संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेत सुसंस्कार शिबिर प्रारंभ

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान
मो.9665175674

(भंडारा)-शालेय जीवनात विद्यार्थी -विद्यार्थींनींना आदर्श दिनचर्या, आई -वडिल व गुरूंजनांचा आदर करण्यास प्रोत्साहन देणे. देशाची भावी पिढी सुसंस्कारित घडावी, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शैक्षणिक शिक्षणा व्यतिरिक्त जीवन शिक्षणाचे आदर्श धडे विद्यार्थ्यांना देऊन आदर्श नागरिक घडावेत असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांनी केले.
ते भंडारा येथील संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयाच्या वतीने विद्यालयाच्या प्रांगणात व्यक्तिमत्व विकास सुसंस्कार शिबिरात मार्गदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे, मुख्याध्यापक देवचंद चौधरी, मुख्याध्यापिका अर्चना भोयर इत्यादी शिक्षक -शिक्षिका उपस्थित होत्या.

बाल संस्कार शिबिर दिनांक ८ ते १६ एप्रिल २०२४ पर्यंत चालणाऱ्या शिबिरात योग- प्राणायाम, संस्कारमय गीत, बोधकथा, बौद्धिक तासीका, स्पर्धा परीक्षा, चित्रकला, टाकावू पासून टिकाऊ वस्तू, आपत्ती व्यवस्थापन, नृत्य, सुंदर हस्ताक्षर इत्यादी चांगल्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. विद्यार्थी -विद्यार्थींनींनी या शिबिराच्या माध्यमातून आदर्श जीवनाची कला, आत्मसंरक्षण, नेतृत्व क्षमता, एकीचे बळ यांचे धडे देण्यात येईल. असे प्रतिपादन संत शिवराम महाराज उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवचंद चौधरी यांनी केले. त्यावेळी खोकरला पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे यांनी योग- प्राणायाम यांचे महत्त्व व संस्कार शिबिर यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले शाळेतील जवळपास १०० पेक्षा जास्त विद्यार्थी -विद्यार्थींनींनी या शिबिरात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पार्वती बिसने व प्रास्ताविक मुख्याध्यापक देवचंद चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिल्पा आचले यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेकरिता रजनी सेलोकर, सुरेश गोंदोळे, नलिनी बिरे, रंजना भिवगडे, दारासिंग चव्हाण, धीरज बान्ते, गंगाधर भदाडे, राधिका बान्ते, वर्षा साखरे, प्रमिला गिऱ्हेपुंजे, कुसूम सार्वे, माया वैद्य, रंजना चाचेरकर, ज्योती उके इत्यादी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थ्यींनींनी मोलाचे सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved