Breaking News

गुंतवणूकदारांच्या नावाखाली भामट्यानीच लुटले घर???

 

लाडजळगाव चे त्या फरार शेअर मार्केट बिगबुलकडे अनेक बड्या नेत्यांच्या जवळच्यांचे कोट्यावधी रुपये???

विशेष प्रतिनिधी-अविनाश  देशमुख शेवगाव 9960051755

शेवगाव :-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील लाड जळगाव येथील रहिवासी असलेला बिग बुल याच्याकडे तालुक्यातील अनेक व्यावसायिक वाळू तस्कर एका नामांकित शिक्षण संस्थेतील शेकडो प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक जिल्ह्यातील एका बड्या नेत्याचा पी.ए. एक बडा राजकारणी यांचे कोट्यावधी रुपये अडकल्याची चर्चा तालुक्यात खमंगपणे सुरू आहे गेल्या आठवड्यात एक बडा नेता त्याला माझे पैसे टाक बाकीचे मला माहित नाही असा दम देऊन गेला होता विशेष म्हणजे इतकी मोठी फसवणूक होऊन सुद्धा बोधेगाव पोलीस स्टेशन शेवगाव पोलीस स्टेशन माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचेकडे कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही “चोरीचा मामला हळूहळू बोंबला” अशी अवस्था गुंतवणूकदारांची झाली आहे माझे पैसे निघाले बाकीच्यांचं मला काही देणं घेणं नाही याक्तीप्रमाणे *”जे कधी कोणाच्या करंगळीवरही मुतत नाहीत” अशा भामट्या गुंतवणूकदारांचे पैसे बुडाल्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा बरं झालं यांना फार पैशांचा माज होता यांचा माज जिरविणारा कोणीतरी पाहिजेच होता अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य जनता देत आहे*

*ताजा कलाम*

*काही लोकांनी पोटाला चिमटे घेऊन बिगर तेलाच्या भाज्या खाऊन शिक्षक बँक व इतर बँकांकडून लाखो रुपये कर्ज काढून या भामट्याच्या हवाली केले आहेत हा रातोरात कुटुंब घेऊन फराळ झाल्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापासून गुंतवणूकदारांना भाकर गोड लागला*

*क्रमशः*

*शेवगाव शहरातील मातृतीर्थ अर्बन निधी लिमिटेड बुलढाणा या संस्थेच्या तथाकथित संचालक एक भामटा शिक्षक आणि एक भामटा टेलर यांचाही होणार परदाफ़ाश. लोकांना बनवून ठेव पावत्या देऊन अनेकांना गंडविले ??? यांच्या नादी लागून एकाचा पेट्रोल पंप गेला बायकोची नोकरी गेली मेहुण्याला गावात तोंड दाखवायला जागा नाही राहिली तो कोण???*

*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved