Breaking News

नव वधुस आणण्यास गेलेला ट्रॅक्टर ट्रॉली पलटी – घडला अपघात

दोन महिलेचा मृत्यू तर अनेक जण जखमी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-सिंदेवाही वरून १५ कि.मी. अंतरावरील गुंजेवाही कोटा ईथुन चिमूर नेरी जवळील शिवनपायली याठिकाणी नवं वधू ला आणण्यासाठी गावकरी ट्रॅक्टर ने गेले असता अगदी शिवनपायली जवळच ट्रॅक्टर चा हायड्रोलीक दबल्याने ट्रॅक्टर ची ट्रॉली वर झाली व ट्रॉली पलटी मारल्याने अंदाजे ३० ते ३५ जण जखमी झाल्याची घटना घडली.तात्काळ या घटनेची माहिती चिमूर येथील तालुका कॉंग्रेसच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांना मिळताचक्षणी घटनास्थळी धावघेत चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करीता दाखल करण्यात आले.

घटनास्थळी एका २२ वर्षीय मुलीचे निधन झाले तर उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान एका ५५ वर्षीय महिलेचे मृत्यू झाले तर अजूनही जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.अशाप्रकारे दोघांचे मृत्यू तर अनेक जण जखमी झाले असून कोटा तसेच शिवनपायली याठिकाणी शोककळा पसरली असून उपजिल्हा रुग्णालय चिमूर याठिकाणी गावकऱ्यांनी धाव घेत बघ्यांची गर्दी जमली आहे.यावेळी रुग्णालयात चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल व त्यांचा पथक दाखल झाला आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

संस्कार शिबिरातून आदर्श नागरिक घडतात – माजी सभापती नरेंद्र झंझाळ

टवेपार येथील संस्कार शिबीराचा समारोप जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा)- पूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावात …

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

अवैधरित्या रेती वाहतूक करतांना तिन ट्रॅक्टर जप्त जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : – दिनांक. २८/०४/२०२४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved