टेम्पो भरून सामान घेऊन गेले फरार विघ्ने सोशल मीडियावर ऑनलाईन मग पोलिसांना का सापडत नाही???
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमूख शेवगांव 9960051755
शेवगाव:-दिनांक 15 मार्च 2024 सोमवार याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील घोटण खानापूर रस्त्यावरील अंतरवाली येथे गेल्या काही महिन्यापासून छत्रपती विघ्ने आणि त्याचा भामटा सहकारी गणेश कुलट सहकाऱ्याने शेअर मार्केटचेकार्यालय सुरू केले होते त्यात मार्केटच्या नावाखाली लोकांकडून नऊ ते दहा कोटी रुपये जमा करून दोन दिवसांपूर्वी फरार झाला परंतु तो व्हाट्सअप वर एका ठराविक ग्रुपमध्ये मी पळून गेलो नाही मी तुमचे पैसे देणार आहे.
मला थोडी मुदत द्या असे भावनिक आवाहन गुंतवणूकदारांना करत राहिला पण काल रात्री त्याचा सहकारी गणेश कुलट पण फरार झाल्याने चिडलेल्या आणि शुद्ध फसवणूक झालेले गुंतवणूकदार आज दिनांक 15 मार्च 2024 सोमवार रोजी सकाळी 10:00 वाजता त्याच्या कार्यालयावर धडकले आणि कार्यालय फोडून त्यातील फर्निचर कम्प्युटर लॅपटॉप फॅन खुर्च्या आणि इतर साहित्य टेम्पो भरून घेऊन गेले शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची अवस्था “हरणाच्या शिंगाला पैसे बांधलेल्या” लोकांसारखी झालेली आहे.
मागे एकदा सोनविहीर गावचा रहिवासी असलेला के के उर्फ कानिफनाथ काजळे या भामट्याने सुद्धा शेवगाव शहरातथाटा माटात लग्न तालुका भर लग्नाची फ्लेक्स थार गाड्यांची लाईन आणि फॉर्च्युनर सारख्या गाड्या लग्नामध्ये हळद लावायला हिरोईन सोबत बाउन्सर असा थाट केला होता. { गोरगरीब गुंतवणूकदारांच्या जीवावर आयजी च्या जीवावर बायजी } असे भामटे आज भूमिगत झालेले आहेत, दोन महिन्यापूर्वी फरार झालेला कानिफनाथ काजळे आणि काल परवा फरार झालेला छत्रपती विग्ने यांनी शेवगाव तालुक्यात अक्षरशा धुमाकूळ घातलेला आहे गुंतवणूकदारांची अवस्था “धरलं तर चावतंय आणि सोडलं तर धावतय” अशी झाली आहे. शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक होऊन सुद्धा कोणीही सायबर क्राईम कडे ऑनलाइन तक्रार करण्यास धजावत नाही “चोरीचा मामला ना हळूहळू बोंबला” अशी झाली आहे उद्या भविष्यात जरी हे फरार शेअर मार्केटचे बिग बुल सापडले तर त्यांचे गुंतवणूकदार काय काढून घेणार ???.
*ताजा कलम*
*या सर्व फरार शेअर मार्केट वाल्यांची खाते जर सायबर क्राईमने गोठवले तर यांची खायची आणि हागायची पंचायत होईल आणि ते पुन्हा गाव गाठतील इतकी साधी गोष्ट गुंतवणूकदारांच्या लक्षात येत नाही आणि अहमदनगर पोलीस प्रशासन त्यांचे वृद्ध ठोस कारवाई करत नसल्यामुळे या भामट्या बिग बुल्स च चांगलच फावल आहे पण म्हणताना बकरी की अम्मा कबतक खैर मनायेगी एकदा तडाख्यात सापडल्यानंतर त्यांचा माज निश्चितच पोलीस प्रशासन उत्तरवेल आणि गोरगरिबांना न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला काहीही हरकत नाही*
*विशेष बाब*
*रोख रक्कम साठवण्यासाठी हवाला पद्धत आणि घरामध्ये तळघरासारखा खड्डा या लोकांनी खाल्ला होता कोट्यावधी रुपये यांनी रोख साठवले होते त्यामुळे ते ऑनलाइन व्यवहार सुद्धा दिसत नाहीत काहींनी दुबईत व परदेशात आपल्या मित्रांकडे पैसे पाठवल्याचेही चर्चा आहेत*
*अविनाश देशमूख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*