“रुद्रा इन्व्हेस्टमेंट” लिमिटेड या नावाने हादगाव मध्ये आपले सरकार कार्यालयामध्ये थाटलेले सचिन ताराचंद अभंग सुमारे साडेसात कोटी रुपये घेऊन फरार
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील हदगाव येथील रहिवासी असलेला “सचिन ताराचंद अभंग” हा भामटा बिग बुल “रुद्रा इन्व्हेस्टमेंट” नावाने हातगाव कांबी आणि पंचक्रोशीतील शेतकरी व्यापारी नागरिक महिला तरुण आणि वृद्ध यांचे कडून 10 ते 15 % व्याजाचे आमिष दाखवून येथील एका भाड्याने घेतलेल्या “सेतू कार्यालया मध्ये” रुद्रा फायनान्स नावाने काही महिन्यांपूर्वी शेकडो लोकांना गंडा घालून लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी रात्री आपल्या आलिशान गाडी सह फरार झाला आहे त्याला साथ देणारे त्याच्या दोन भामटे मित्रांनी कार्यालयाच्या बोर्ड गायब केला आहे गावातील एक माजी सरपंच त्याला { देवून घेऊन } वाचवण्याचा केविलवाणा आटोकाट प्रयत्न करत आहे पण म्हणतात ना “बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी” या ऊक्ती प्रमाणे आपल्या गरीब आई बापाला गावातच लोकांचे टोमणे खायला सोडून परागंदा झाला आहे सुरुवातीला त्याचे आई-बाप घरी तगादया करिता येणारया लोकांना आम्ही आमचं वावरी खूप पण तुमचे पैसे देऊ यांच वावरच काय यांच्या किडन्या विकल्या तरी लोकांचे पैसे भेटणार नाहीत हादगाव कांबी मुंगी आणि तालुक्यातील इतर खेड्यांमधून या भामट्या सचिन अभंग ने शेकडो लोकांकडून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता गोळा केली लोकांनी बकऱ्या विकून बचत गटाचे पैसे कर्जाने काढून सोना नानक विकून वावरे गहाण ठेवून म्हातारपणाची काठी म्हणून साचलेले पैसे या भामट्याच्या हवाली केले दुखणं बहाण लेखी बाईंचा लग्न यासाठी जी काही थोडीफार रक्कम लोकांनी साठवून ठेवली होती या माळ्यावर च लोणी खाणाऱ्या भामट्याने एका रात्रीत गायब केली*
*ताजा कलम*
*तालुक्यातील हजारो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून हे आली बाबा आणि चाळीस चोर पुण्यनगरी पुणे येथे उपनगरांमध्ये दडून बसल्याची चर्चा आहे काही नाही तिथेच फ्लॅट विकत घेतलेत तर काय मी दुसऱ्या नावाने कार्यालय थाटले शेवगा आणि अहमदनगर पोलीस यांची निश्चितच दखल घेतील आशिया गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे*
*विशेष बाब*
*पळून गेलेला एक भामटा बिग बुल म्हणतो माझी गावाकडे एवढी इज्जत गेली मला तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही ??? गोरगरीब लोकांचे पैसे देऊन टाक आणि खुशाल चौकामध्ये फाशी घे !!! लोकांनी त्यांच्या लेकरा बाळाच्या तोंडातील घास काढून काय तुला मौज मजा करायला पैसे दिले होते का ??? याची नोंद घे भामट्या ज्यांची सायकल घ्यायची लायकी नव्हती ते पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या घेऊन फिरत होते आता गाडी विकायची पाळी आली आहे त्यांच्यावर*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*