जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674
(भंडारा)- अहिल्यादेवी ह्या दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्यांची राज्यकारभारावर प्रशासकीय पकड घट्ट होती. वडिलांच्या शिकवणूकीचा आणि सासरे मल्हारराव यांनी दिलेल्या राजकीय कारभाराच्या तालमीचा त्यांनी उपयोग करून घेतला. त्यांनी देशभर भ्रमंती करतांनी तिर्थक्षेत्रांच्या जागी धर्मशाळा बांधल्या. शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला. २८ वर्ष त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलतेने चालवला. कोणतेही कर्ज न काढता राज्याची तिजोरी भक्कम करुन त्यांनी प्रजाहिताकडे लक्ष दिले. आदर्श राज्यकारभार कसा करावा याचा वस्तुपाठच अहिल्यादेवींनी घालून दिला. म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी अहिल्यादेवी होळकर यांचे आदर्श जोपासावे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते शेखर बोरसे यांनी केले. ते धनगर अधिकारी कर्मचारी संघटना भंडारा, गोंदिया यांच्या वतीने आयोजित भंडारा येथील पंडित पांडे रामनगर खातरोड येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त मार्गदर्शन करतांना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते शेखर बोरसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून धनगर अधिकारी कर्मचारी संघटना भंडारा, गोंदियाचे सुरेश घोडे, मार्गदर्शक रामराव लोहारे, दादाजी लुचे, ईश्वर लोहारे, दत्तात्रेय कमळे, विठ्ठल टेडे, राहुल शिंदे, अमोल मस्के, प्रदीप गडदे, विरमलाल अहिर, विद्याताई पांडे, प्रदीप पोराटे, सुचिता डाखोरे, अमोल खांदवे, राजू होड, पंडित पांडे, पांडुरंग पोराटे, अजय देवकाते, विष्णू कलबंड, शंकर बोरसे, रविंद्र चांहादकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी राजमाता पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती प्रतिमेला मार्ल्यापण करून येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणा देत अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगावर मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजलि योग समितीचे अध्यक्ष यशवंत बिरे व प्रास्ताविक कार्याध्यक्ष नरेश पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कोषाध्यक्ष मनोहर अहिर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शुभम पांडे तसेच धनगर अधिकारी कर्मचारी संघटना भंडारा, गोंदियातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.