जनार्दन साहेबराव नेमाने यांनी केले ग्राहकाला परत पंचक्रोशीत अभिनंदनाचा वर्षाव
विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755
शेवगाव:-दिनांक 06 जुन 2024 गुरुवार अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा शेवगाव येथे काल दिनांक ५ / ६ / २०२४ रोजी दु. ३ वा हेमलता सोलाट रा. मिरी ता.पाथर्डी यांच्या कडून नजरचुकीने सुमारे 2 लाख रुपये किमतीचे ३ तोळे सोने लॉकरच्या बाहेर राहीले* .त्यानंतर जनार्दन साहेबराव नेमाने रा. चापडगाव ता शेवगाव हे लॉकरसाठी तेथे आले.त्यांच्या हे सोने दृष्टित पडले.त्यांनी तात्काळ शाखाधिकारी श्रीराम आंधळे यांच्या निदर्शनात आणून दिली.सदर सोने हे संबंधित श्रीमती हेमलता सोलाट बँकेत आल्यानंतर नेमाने साहेब व त्यांच्या पत्नी सौ. नंदाताई नेमाने मॅडम यांनी सदरचे तीन तोळे सोने त्यांना दिले.त्यावेळी बँकेत त्यांनी आनंद व्यक्त केला.
सदर घटना समजताच बँकेचे संचालक रमेश गोरे यांनी जनार्दन साहेबराव नेमाने व सौ.नंदाताई नेमाने यांचा प्रामाणिक पणा बद्दल सत्कार करण्यातआला.नेमाने साहेब हे शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलासराव नेमाने यांचे बंधू आहेत. यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे व्हा. चेअरमन काकासाहेब घुले सर,शाखाधिकारी श्रीराम आंधळे ,जय ढाकणे,बाळासाहेब फुंदे ,डॉ.परदेशी व बाळासाहेब आहेर आदि उप. होते.
*ताजा कलम*
*एकीकडे जगामध्ये नळाला लटकवलेला ग्लास चोरनारे आणि बँकेत लिहिण्यासाठी ठेवलेला पेन खिशात घालणारे महाभागवत दिसत असतात परंतु लाखो रुपयांचा ऐवज फक्त आपल्यावर झालेले संस्कार यातून त्या माय माऊलीच्या हवाली केल्याने समाजामध्ये अशा लोकांची गरज आहे एरवी रस्त्यावर पडलेला मोबाईल बेवारस किमती सामान अलगद खिशात घालणारे नमुने आपण एरवी पाहतो परंतु सुमारे दोन सव्वा दोन लाख रुपये किमतीचा ऐवज निरपेक्ष हेतूने परत दिल्याने परिसरामध्ये या कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*