तालुका प्रतिनिधी – सलीम शेख नागभीड
नागभीड :- चंद्रपूर जिल्ह्यातील वडसा-ब्रम्हपुरी राष्ट्रीय महामार्गावरील भुती नाल्यावर नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. रहदारी करण्यासाठी बाजूला कच्चा रस्ता बनविण्यात आला आहे. नाल्याचे पाणी वाहून जाण्याकरिता रस्त्याखाली पाईप टाकण्यात आले आहेत. संथ गतीने बांधकाम सुरू आहे. त्यातच
आता पावसाचे पाणी वाढल्याने हा मार्ग रहादरीसाठी बंद करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 543 वडसा ब्रम्हपुरी ते थेट कुरखेडापर्यंत जातो. ब्रह्मपुरी जवळ इंग्रज कालीन पूल होता. काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. पावसाच्या दिवसात वैनगंगा नदीला पूर येत असल्याने या पुलावरून पाणी वाहते.