Breaking News

चिमूर नगर परिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात काँग्रेसने केले धरणे आंदोलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात आज दिनांक ०२/०८/२०२४ ला तालुका काँग्रेस कमिटी चिमूर मार्फत तहसील कार्यालय समोर चिमूर नगर परिषदच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभार तसेच चिमूर शहरातील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार पिण्याचे पाणी ,विज पुरवठा , रस्ते , नाली बांधकाम ,आरोग्य , शिक्षण , कृषी ,अशा अनेक रास्त प्रलंबित रखडले मुद्दे जनतेसमोर यावे यासाठी एक दिवसीय लक्षणीय धरणे आंदोलन दुपारी १२ वाजेपासून तर ५ वाजे पर्यंत करण्यात आले.

धरणे आंदोलन संपल्यानंतर चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभाराची चौकशी करण्याबाबत चे निवेदन उपविभागीय अधिकारी चिमूर मार्फत राष्ट्रपती,राज्यपाल,मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री सुधीर मुंनगट्टीवार,सचिव नगरप्रशासन, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर,प्राध्यापक राम राऊत , डॉ.सतीश वारजूकर चिमूर विधानसभा समनव्यक, गजानन बुटके माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव , धनराज मुंगले ओबीसी संघटक महाराष्ट्र प्रदेश, संजय घुटके जिल्हा काँग्रेस कमिटी महासचिव , राजेश चौधरी स्विय्य सहाय्यक खासदार किरसान,विलास मोहिणकर तालुका सरचिटणीस , प्रदिप तळवेकर पर्यावरण अध्यक्ष, नागेन्द्र चट्टे , राकेश साटोने ,रोहन नन्नावरे महासचिव युवक काँग्रेस,केशव वरखडे ,घनश्याम रामटेके ,अरुण दुधनकर , साईश वारजूकर सरपंच शंकरपूर ,नितीन कटारे ,विनोद ढाकुनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते‌.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव २४ ते २६ नोव्हेंबरला तळोधी (नाईक) येथे आयोजित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमुर- श्री. गुरूदेव सेवा मंडळ तळोधी (नाईक) च्या वतीने दि. २४ ते …

बोडधा येथे एका युवकास मारहाण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुक्यात बोडधा येथे हनुमान मंदीर चौकात कॉर्नर सभेमध्ये एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved