जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- भाजप महायुती शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी, कल्याणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतलेले असतांना चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात लाभ मिळाला. त्यात आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडिया यांचा मोलाचा वाटा ठरल्याने शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सत्कार कार्यक्रम आज दिनांक ५ सप्टेंबर दुपारी २:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती एकनाथ थुटे संयोजक भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा यांनी दिली.महायुती सरकारने दोन वर्षात शेतकऱ्यांना पीक विमा, कापूस, सोयाबीन अनुदान, धान बोनस रक्कम, वीज बिल माफ, दिवसा शेती साठी १२ तास वीज पुरवठा असे अनेक शेतकरी वर्गाला सुखी करणारे निर्णय घेतले आहे.
आमदार बंटी भांगडिया यांनी सतत पाठपुरवठा करीत शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांत एक आनंदाची लॉट आहे. शेतकऱ्यांच्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांचा सत्कार कार्यक्रम दिनांक ५ सप्टेंबर दु २ वा कार्यक्रम नवीन वाडा पिंपळनेरी रोड येथे आयोजित केलेला आहे. शेतकरी बांधवानी उपस्थित राहण्याचे आवाहन एकनाथ थुटे संयोजक भाजप किसान आघाडी चिमूर विधानसभा यांनी केले आहे.