विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर :- कामठी विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पार्टी-महायुती अधिकृत उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कामठी तहसील कार्यालयात नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती घटक पक्षातील सर्व महत्वाचे नेते यांच्यासह कामठी विधानसभा क्षेत्रातील विशाल जनसमुदाय उपस्थित होता.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर समारोप सभेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुनील केदार यांनी एकही कार्यकर्ता असा तयार केला नाही, ज्याला उमेदवारी देऊ शकत नाही. त्यांना कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. केदारांनी २५ वर्षांच्या राजकारणात एकही कार्यकर्ता तयार करू शकले नाहीत. मी असतो तर लहानशा कार्यकर्त्याला निवडून आणत आमदार केले असते. कामठी मध्ये लहानसा कार्यकर्ता कमळावर उभा झाला तरी तो निवडून येऊ शकतो, अशी ताकद भाजपाची आहे. येत्या काळात जिल्हा परिषद यासह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्यावेळी कार्यकर्ते लढणार आहेत, असेही बावनकुळे म्हणाले. समारोपाच्या सभेत आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांचीही भाषणे झाली, त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.