वरोरा चिमूर महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर : – एकाच आठवड्यात घडल्या दोन घटना, वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द समोर लोणकर राईस मिल जवळ सायं ०७:०० वाजताच्या सुमारास दुचाकीला अज्ञान वाहणाने धडक दिल्यामुळे एक मुलगा जागीच ठार झाला तर दोघे जण जखमी आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरारो येथे दाखल करण्यात आले असून हिमांशू भाविक जुनारकर हा जागीच ठार झाला व आदर्श विजय तुराणकर, साईल श्रावण बावणे हे जखमी झाले आहे. सर्वजण चारगाव बुद्रुक येथील रहिवासी असून घटनास्थळी चिमूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी राकेश जाधव तसेच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश यादव, पोलीस कर्मचारी दाखल झाले आहे.
परिसरातील शेकडो गावकरी यांनी मृत व्यक्ती व जखमीना नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत मृतकाचे प्रेत उचलण्यास नकार दिला आहे. वरोरा, शेगाव,चिमुर 353 ई राष्ट्रीय महामार्गाने किमान २ तासापासून महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञान वाहन संशयास्पद पकडले असून दोन आरोपीला शेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा करण्यात आले आहे. अजूनही मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी तणावाचे वातावरण कायम असून बघ्यांची गर्दी व जमाव वाढतच चालला आहे. या अगोदर सुद्धा दुचाकी चालक मुलाला बस ने चिरडल्याची घटना घडली असल्याने दोषी महामार्ग आहे कि अज्ञात वाहन? याचा शोध जोमाने सुरु आहे.